IMPIMP

Pune Crime | पुण्यातील पद्मावती चौकात टोळक्याची दहशत, मध्यरात्री तरुणावर कोयत्याने सपासप वार

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे शहरातील पद्मावती चौकामध्ये (Padmavati Chowk) एका टोळक्याने दहशत माजवून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार (Stabbed) केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे – सातारा रस्त्यावरील (Pune Satara Road) पद्मावती चौकातील एका चहा विक्रीच्या दुकानासमोर घडली आहे. टोळक्याच्या हल्ल्यात चंद्रकांत दऱ्याप्पा कांबळे (Chandrakant Daryappa Kamble) हा गंभीर जखमी (Pune Crime) झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत जखमी चंद्रकांत कांबळे (वय – 26 रा. मांगडेवाडी, कात्रज – Katraj) याने सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आकाश कसबे (Akash Kasbe) आणि त्याच्या इतर साथिदारांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

जखमी चंद्रकांत कांबळे आणि त्याचा मित्र मध्यरात्री बाराच्या सुमारास सातारा रस्त्यावरील पद्मावती चौकातील एका चहाच्या दुकानासमोर चहा पित उभा होते.
त्यावेळी दोन ते तीन दुचाकीवरुन टोळके आले.
आरोपी कसबे याने कांबळेसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
तू माझ्या भावाला का मारलेस अशी विचारणा करुन कसबेने कांबळे याच्यावर कोयत्याने वार केले.
तर त्याच्या इतर साथिदारांनी चहा पिण्यासाठी थांबलेल्या नागरिकांना शिवीगाळ (Abusive) करुन परिसरात दहशत माजवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लोंढे (API Londhe) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | terror of mob at padmavati chowk on pune satara road the young man was stabbed in the middle of the night

 

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | 14 तारखेला दुसरी बाजू लोकांसमोर आणणार, CM उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

Pune Crime | धक्कादायक ! अवघ्या 4 महिन्यांच्या बाळाला रिक्षात ठेवून पालक गायब; खेड-शिवापूरमधील घटना

Gulabrao Patil on Raj Thackeray | “ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात, त्या शिवसेनेवर…”; गुलाबराव पाटलांचं राज ठाकरेंवर टीकास्त्र !

 

Related Posts