IMPIMP

Pune Crime | डिलीव्हरीसाठी दिलेले एलईडी टिव्ही टेम्पोचालकाने परस्पर विकले; कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Pune: Extortion demand of 30 lakhs from builder, case against three in Kondhwa police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी टेम्पोवर नेमलेल्या चालकाने ग्राहकांना पोच करण्याऐवजी परस्पर एलईडी टीव्ही (LED Tv) विकल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी विनायक दिंगबर तापकीर (वय २४, रा. तळेगाव ढमढेरे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५३०/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राम महादेव कोळी Ram Mahadev Koli (वय २५, रा. कोरोळ, ता. उमरगा – Umarga, जि. उस्मानाबाद – Osmanabad) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तापकीर यांचे पिसोळी येथे महावीर इलेक्ट्रॉनिक्स (Mahavir Electronics, Pune) हे दुकान आहे. त्यांच्याकडे चालक म्हणून राम कोळी हा नोकरीला होता. फिर्यादी यांनी १७ मे रोजी त्याला ८ एल ई डी टीव्ही डिलिव्हरी करण्यासाठी दिले. त्यापैकी त्यातील फक्त ४ एल ई डी टीव्ही त्याने डिलिव्हरी केले. इतर ४ टी व्ही त्याने स्वत:च्या फायद्याकरीता विकून फिर्यादी यांची २ लाख ५० हजार ९८५ रुपयांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | The LED TVs provided for delivery were sold by the tempo operator to each other; Crime at Kondhwa police station

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | मुलीचे फोटो मॉर्फ करुन एस्कॉर्ट साईटवर अपलोड करण्याची डॉक्टरला धमकी, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

Maharashtra TET Exam Scam Case | TET घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपेला जामीन मंजूर

Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचं आगमन; हवामान खात्याचा अंदाज

 

Related Posts