IMPIMP

Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचं आगमन; हवामान खात्याचा अंदाज

by nagesh
Rain in Maharashtra | maharashtra rain update heavy rain in maharashtra mumbai pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Monsoon Update | अरबी समुद्रात (Arabian Sea) मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला
मान्सून अखेर केरळात (Kerala) दाखल झाला आहे. यावर्षी वेळेआधीच मान्सून केरळात दाखल झाला आहे. मान्सूनचा पुढचा प्रवासही वेळेत होणार
असल्याचंही भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) सांगण्यात आलं आहे. यामुळे आता महाराष्ट्रात
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. अशात 6 ते 10 जून या काळात महाराष्ट्रात मान्सून दाखल (Maharashtra Monsoon
Update) होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हवामानाच्या अंदाजानुसार, सध्या मान्सून अरबी समुद्राचा मध्यभाग, केरळ (Kerala), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि कर्नाटकाच्या (Karnataka) काही भागात दाखल झाला आहे. राज्यात आगामी 4 दक्षिण कोकण (South Konkan), दक्षिण मध्य महाराष्ट्र (South Central Maharashtra) आणि मराठवाड्यातील (Marathwada) लगतच्या काही भागामध्ये गडगडाटासहसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं Indian Meteorological Department (IMD) सांगितलं होतं. त्यानुसारच आता राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. (Maharashtra Monsoon Update)

 

दरम्यान, महाराष्ट्रात किमान चार ते पाच दिवस अगोदर मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, राज्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बहुतांश शहरांत ‘उत्तम ते मध्यम’ श्रेणीत नोंदवला जात आहे. या दरम्यान, सोमवारपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. तसेच, या आठवड्यामध्ये, मुंबईसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत मधूनमधून पाऊस आणि मेघगर्जनेसह अंशतः ढगाळ आकाश दिसेल. असं हवामान खात्याने (IMD) सांगितलं आहे.

 

Web Title : Maharashtra Monsoon Update | monsoon arrival in maharashtra 2022

 

हे देखील वाचा :

Harmful Effects Of Raw Food | ‘या’ गोष्टींना कधीच खाऊ नका कच्चे, नाहीतर होऊ शकतात गंभीर परिणाम; जाणून घ्या

Best Tax Saving Investments and Tax Calculations | ‘या’ 4 योजनांमध्ये मिळतो जबरदस्त रिटर्न, गुंतवणुकदार करू शकतात 1.50 लाख रुपयांपर्यंत टॅक्सची बचत

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंधानंतर विवाहाला नकार; प्रियकरासह त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल

 

Related Posts