IMPIMP

Pune Pimpri Crime | मुलीचे फोटो मॉर्फ करुन एस्कॉर्ट साईटवर अपलोड करण्याची डॉक्टरला धमकी, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

by nagesh
Woman Arrest

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Pimpri Crime | एका डॉक्टरला (Doctor) त्यांचे आणि त्यांच्या मुलीचे फोटो मॉर्फ (Photo Morph)
करुन ते एस्कॉर्ट साइटवर (Escort Site) टाकण्याची धमकी (Threat) देऊन तिघांनी खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
आरोपींनी डॉक्टर कडून ऑनलाइन खंडणीची रक्कम स्वीकारली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) IPC 384,
385, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (Information Technology Act) तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन एका महिलेला अटक (Pune
Pimpri Crime) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

श्वेता सिंग Shweta Singh (वय-21 रा. हलियापूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यासह 7700006124 क्रमांकावरील जितेंद्रकुमार (Jitendra Kumar), गुगल पे क्रमांक 7992344364 धारक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत म्हाळुंगे येथील 46 वर्षाच्या डॉक्टरने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुलेखा डॉट कॉम स्पा अँड ब्युटी सर्व्हिसेस अॅट होम (Sulekha.com Spa and Beauty Services at Home) द्वारे फिर्यादी यांना सर्व्हिस देण्याच्या बहाण्याने रोख रकमेची मागणी केली. धमकी देऊन पैशांची मागणी केली परंतु फिर्यादी पैसे देत नसल्याचे समजताच आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलीचे फोटो न्यूड मॉर्फ (Nude Morph) केले. ते फोटे एस्कॉर्ट साईटवर पाठवण्याची धमकी देऊन फोटो फिर्यादी यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले. त्यानंतर 10 हजार रुपयांची मागणी करुन त्यातील चार हजार रुपये गुगल पे द्वारे स्विकारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे (Police Inspector Sunil Dahiphale) करीत आहेत.

 

Web Title : Pune Pimpri Crime | Doctor threatens to morph girl’s photo and upload it on escort site, woman arrested for demanding ransom

 

हे देखील वाचा :

Maharashtra TET Exam Scam Case | TET घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपेला जामीन मंजूर

Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचं आगमन; हवामान खात्याचा अंदाज

Harmful Effects Of Raw Food | ‘या’ गोष्टींना कधीच खाऊ नका कच्चे, नाहीतर होऊ शकतात गंभीर परिणाम; जाणून घ्या

 

Related Posts