IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘एक जागा जरी हरलो असलो तरी…’

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar comment on himachal pradesh and gujarat assembly election 2022 result

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन NCP Chief Sharad Pawar | राज्यसभा निवडणूकीच्या निकालावर (Rajya Sabha Election Results 2022) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष (BJP) यशस्वी ठरला आहे. अपक्ष आमदार आपलेसे करण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यश आलं. राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही. पण राज्यसभा जरी हरलो असलो तरी राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारला (Thackeray Government) कोणताही धोका नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आताच्या लागलेल्या निकालामुळे महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) एक धक्का बसला आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार जिंकल्याने फडणवीसांनी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना चितपट केल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर झालं आहे. त्याची झलक आता विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळेल, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु असतानाच आता यावर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे.

 

“तिन्ही पक्षांना मिळालेली मतं लक्षात घेतली तर सरकारला सरकार चालवायला जे बहुमत हवंय त्यात काहीही धोका नाहीये. आमचं एकही मत फुटलेलं नाही. त्यामुळे राज्यसभा जरी हरलो असलो तरी राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारला कोणताही धोका नाही. उलट आम्हालाच (प्रफुल्ल पटेल) भाजपच्या गोटातून एक मत मिळालं असल्याचं,” शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले. “राजकारणात रिस्क घ्यावीच लागते, जी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घेतली.
अतिशय कमी मतं असतानाही त्यांनी ही जागा लढवली आणि ती जवळपास 33 मतापर्यंत आणली.
शिवसेनेच्या आमदाराचं मत का बाद झालं मला माहित नाही. त्यांनी काय केलं मला माहित नाही,
पण इतर तिघांसंबंधी जो निवडणूक आयोगाचा (Election Commission) निर्णय आहे तो योग्य असल्याचं,”’ देखील ते म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पवारांनी केले फडणवीसांचे कौतुक –
शरद पवार म्हणाले, “अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे.
अपक्ष आमदार आपलेसे करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं. त्यांची रणनिती त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली.”

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar comment on maharashtra rajyasabha election results 2022

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh On Thackeray Government | चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाल्या – ‘करेक्ट कार्यक्रम, अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर’

Rajya Sabha Election Results | राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर भाजप नेत्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘…आता विधान परिषदेतही धक्क्यावर धक्के’

Rajya Sabha Election Results-2022 | ‘देवेंद्र फडणवीसांना माणसं आपलीशी करण्यात यश’ – शरद पवार

 

Related Posts