IMPIMP

Pune Crime | घरात शिरुन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून घातला दरोडा, झटापटीत महिला जखमी; उरुळी कांचन मधील पांढरस्थळ वस्तीमधील घटना

by nagesh
Pune Crime | Thieves broke into a house and stabbed a woman, injuring her; Incident in Uruli Kanchan Lonikalbhor police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | घरात शिरुन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून (Thieves Are Afraid Of Knives) महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरुन नेऊन दरोडा घातला. यावेळी झालेल्या झटापटीत महिला जखमी (Woman Injured) झाली आहे (Pune Crime). याप्रकरणी बेबी महादेव कांचन (वय ५५, रा. पांढरस्थळ वस्ती, उरुळी कांचन – Uruli Kanchan ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात Lonikalbhor Police Station (गु. रजि. नं. २०३/२२) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा (Robbery Case) दाखल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन व त्यांचे पती घरात झोपले असताना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाच चोरटे घराजवळ आले. त्यांनी किचन रुमच्या खिडकीवाटे काठी घालून दरवाजाची कडी काढली. त्यानंतर पाच जण आत शिरले. त्यांनी महादेव कांचन यांना चाकूचा धाक दाखवला. फिर्यादी यांच्या गळ्यातील मंगळसुत्र व कानामधील सोन्याचे दागिने असा १ तोळे वजनाचे सोने जबरदस्तीने चोरुन नेला. (Pune Crime)

 

फिर्यादी यांनी त्यांना प्रतिकार करताना झालेल्या झटापटीत बोटाला चाकू लागून दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अन्य अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

 

Web Title :- Pune Crime | Thieves broke into a house and stabbed a woman, injuring her; Incident in Uruli Kanchan Lonikalbhor police station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील हडपसर परिसरात विवाहितेची टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या; पतीसह निवृत्त प्राध्यापक सासर्‍यांना अटक

Mumbai High Court On Pune Water Supply | पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांत टँकरने पाणी पुरवठा करा – मुंबई हाय कोर्ट

Road Safety Rules | देश अपघातमुक्त होण्यासाठी शासनाबरोबरच मोटार ड्रायव्हिंग स्कूल संस्थांची भूमिका महत्वाची – जितेंद्र पाटील

 

Related Posts