IMPIMP

Property Card | आता घरबसल्याच मिळणार डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

by nagesh
Pune News | The e Ferfar scheme now includes a property card

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Property Card | भूमी अभिलेख विभागाने (Department of Land Records) विविध प्रकारच्या सेवा ऑनलाइन देण्यावर भर दिला आहे.त्याचाच एक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड (property card). पुणे शहरात (Pune News) एखादी मिळकत खरेदी केली अथवा हक्कसोडपत्र किंवा बक्षीसपत्र केले तर प्रॉपर्टी कार्डवर त्यांची नोंद करण्यासाठी आता नागरिकांना सिटी सर्व्हे कार्यालयात (city survey office) हेलपाटे मारावे लागणार नाहीत. कारण दस्त नोंदणी कार्यालयात तिन्हीपैकी कोणतीही दस्त नोंदणी केल्यानंतर त्याची माहिती ऑनलाइन सिटी सर्व्हे कार्यालयात होणार आहे. त्यामुळे कोणतीही हरकत आली नाही तर १५ दिवसांत त्यांची नोंद घेतली जाणार असून नागरिकांना घरबसल्याच डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. जुन्या पद्धतीने ही नोंद करण्यास साधारण एक ते दीड महिना लागतो.

भूमी अभिलेख विभागाने अनेक ऑनलाइन सेवा सुरु केल्या आहेत. दस्त नोंदणी झाल्यानंतर ऑनलाइनच्या माध्यमातून संबंधित जमिनीच्या सातबारा
आणि फेरफार उताऱ्यामध्ये नोंद घेणाऱ्या ई-फेरफार योजनेत आता प्रॉपर्टी कार्डचाही समावेश करण्यात आला आहे. या समावेशामुळे नागरिकांचे
हेलपाटे बंद होणारच असून वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे. या नव्या प्रणालीमुळे गैरप्रकारांना ही आळा बसणार आहे. प्रॉपर्टी कार्डच्या मिळकतींच्या खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन ई-फेरफार करण्यासाठी एनआयसी मार्फत विकसित केलेल्या संगणक प्रणालीचा वापर भूमि अभिलेख विभागाने प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील सहा जिल्ह्यात सुरु केला आहे. त्यामध्ये पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराचाही समावेश केला आहे. त्यामुळे एखाद्या मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर केवळ १५ दिवसांत त्या मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डवर ऑनलाइनच्या माध्यमातून फेरफारची नोंद घेतली जाणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 हरकतींसाठी १५ दिवस

प्रॉपर्टी कार्डवरील मिळकतीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर त्याची माहिती या संगणकीय प्रणालीनुसार ऑनलाइनने भूमि अभिलेख कार्यालयाला मिळणार आहे. त्यानंतर त्याची छाननी होऊन लगेचच टिपण्णी होऊन टिपण्णी मंजूर नोटीस तयार करून ती ज्यांचा मेल आयडी असेल त्यांना ई-मेलने आणि ज्यांचे पत्ते असतील, त्यांना टपालाने पाठविणार आहे. ही सर्व प्रकिया ऑनलाइन आणि एकाच दिवसात होणार आहे. मात्र या नोटिसीवर हरकत घेण्यासाठी १५ दिवसांचा देण्यात आला आहे. हरकत दाखल न झाल्यास ऑनलाइनच प्रॉपर्टी कार्डवरील ई-फेरफार तयार होईल त्यानंतर तो नागरिकांना ऑनलाइन पाहता येईल. केवळ १३५ रुपये ऑनलाइन भरून डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड घरबसल्या मिळणार आहे.

दहा सदनिकांच्यावर असलेल्या सोसायट्याचे डिम कन्व्हेन्स झाले असेल, तर अशा सोसायट्यांचे
प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहे. मात्र, त्या प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव येणार आहे, तर डीड ऑफ डिक्लेरेन्स झाल्यानंतर अपार्टमेंटचे नाव प्रॉपटी कार्ड येणार आहे.दरम्यान, शहरासह जिल्ह्यात महिन्याकाठी सुमारे नऊशे ते एक हजार अर्ज प्रॉपर्टी कार्डवर नोंदणी अथवा इतर कामांसाठी दाखल होतात. त्यामुळे सिटी सर्व्हे कार्यालयात नागरिकांची वर्दळ होती. मात्र ऑनलाइन सुविधेमुळे ही सर्व गर्दी टळणार आहे. digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर हे पाहता येणार आहे.

 

काय होणार फायदे ?

नागरिकांना मालकीहक्काचा कायमस्वरूपी पुरावा होणार आहे, एकच सदनिका अनेकांना विकण्याच्या प्रकारांना आळा बसेल, मिळकतीवर कर्ज घेणे सुलभ होणार आहेच पण विक्री करताना येणाऱ्या अडचणी दूर होईल, खरेदी-विक्रीतील फसवणूकही टळणार आहे.

राज्यातील सहा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश केला आहे.

 

Web Title : Property Card | you will get a property card at home pune news

 

हे देखील वाचा :

Nanded News | 2 महिला शेतातून काम करून घरी परतत असताना काळानं घातला घाला

Pune Crime | दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात भाडे तत्त्वावर घेतलेल्या 77 कारचा वापर दारुच्या वाहतुकीसाठी

 

Related Posts