IMPIMP

Mumbai Crime | अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉर्न दाखवून केलं मास्टरबेट, शिक्षक ‘गोत्यात’

by nagesh
Pune Crime | Lure girlfriend money with porn star fame; Friends made video circulating on porn sites, shocking scenes from Pune's Warje Malwadi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Mumbai Crime | मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 30 वर्षाच्या शिक्षकाने (Teacher) अल्पवयीन विद्यार्थिनीला (Student) पॉर्न चित्रफीत दाखवून मास्टरबेट केल्याचा आरोपा अंतर्गत शिक्षकाला एक वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. 30 ऑगस्ट 2016 साली या शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील मजकूर दाखवला होता. 2016 मध्ये त्या विद्यार्थीनीचे वय साधारण 5 वर्षे होते. शिक्षकाने केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे परिसरात (Mumbai Crime) खळबळ उडाली आहे.

अधिक माहितीनुसार, या मुलीला तिच्या काकाने तिला सायंकाळी 5.30 वाजता अरबी शिकण्यासाठी शिक्षकाकडे सोडून गेला होता.
यांनतर संध्याकाळी मुलीला घेऊन तिचे वडील घरी गेले.
घरी गेल्यावर आईने विचारले तुला आज काय शिकवलं?. त्यावेळी मुलीने सांगितल्यावर आईला धक्काच बसला.
शिक्षकाने तिला अश्लील फोटो दाखवले आणि त्यांनी काही तरी केले.
असं त्या अल्पवयीन मुलीनं तिच्या आईला सांगितलं.
असा सर्व प्रकार मुलीच्या आईने तिच्या वडिलांना सांगितला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

त्यानंतर चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये (Chembur Police Station) गुन्हा नोंदवण्यात आला. यावरून पोलिसांनी (Police) तातडीने कारवाई करत शिक्षकाचा फोन जप्त केला.
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर शिक्षकाने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
तसेच, मुलीचे पालक फी भरत नसल्यामुळे मला फसवण्याचा कट करत आहेत, असा आरोप देखील केला आहे.
दरम्यान, मुलीने न्यायालयात (Court) सांगितलं की, घटनेच्या वेळी तिच्या बेंचसमोर आणखी एक विद्यार्थी बसला होता.
आरोपीने त्याला चुकीचे काम करण्यास सांगितले होते.
विशेष सरकारी वकील गीता शर्मा (Lawyer Geeta Sharma) यांनी कोर्टाला सांगितले की, मुलीला दाखवलेला व्हिडओ आणि फोटो (Videos and photos) अश्लील आहेत.
मुलीचे पालक त्याला का फसवतील याचे आरोपीने वैध कारण दिलेले नाही.
ते केवळ फीसाठी हे करणार नाहीत.

दरम्यान, नंतर मुलीच्या कुटुंबीयांनी फी जमा केली नाही, याचा कोणताही पुरावा नाही.
आरोपीने मुलीच्या पालकांवर फी भरण्यासाठी दबावही केला नाही.
कोणतेही पालक आपल्या मुलाचे भविष्य फीसाठी पणाला लावणार नाहीत.
अशा घटनांचा मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो, असं न्यायाधीश भारती काळे (Judge Bharti Kale) यांनी म्हटलं आहे.
त्यानंतर न्यायाधीशांनी शिक्षकाला 1 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आणि 10 हजार दंड ठोठावला आहे.
10 हजार दंडांपैकी 8 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडित मुलीला देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

 

Web Title : Mumbai Crime | mumbai court sends arabic teacher 1 yr jail showing porn 5 yr old

 

हे देखील वाचा :

Property Card | आता घरबसल्याच मिळणार डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

Nanded News | 2 महिला शेतातून काम करून घरी परतत असताना काळानं घातला घाला

Pune Crime | दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts