IMPIMP

Pune Crime | अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पतीच्या मित्राकडून बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Crime News | Detectives managed to secretly photograph a woman in Koregaon Park; The police laid a trap and arrested him

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | नोकरीनिमीत्त गावाकडून पुण्यात आलेल्या मित्राला रहायला जागा नसल्याने स्वत:च्या घरात काही दिवसांसाठी ठेवून घेतले. परंतु त्याच मित्राने गैरफायदा घेतला. मित्राची पत्नी अंघोळ करत असताना लपून व्हिडिओ (Bathing Video) काढला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी (Video Viral Threatening) देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार (Rape In Pune) केला. एवढेच नाही तर तिला ब्लॅकमेल (Blackmail) करुन पैसेही उकळले. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune Crime) वाघोली परिसरात एप्रिल 2022 ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.

 

याबाबत 27 वर्षीय पीडित महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पतीच्या मित्रावर आयपीसी 376, 354 अ, 384, 385 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वाघोली परिसरात भाड्याच्या घरात राहते. महिलेच्या पतीने गावाकडच्या मित्राला काम मिळवून देण्यासाठी पुण्यात आणले होते. त्याला एका ठिकाणी काम मिळवून दिले होते. मात्र त्याला राहण्यास जागा नसल्याने महिलेच्या पतीने मित्राला घरी ठेवून घेतले. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, मित्र कामावर गेल्यानंतर फिर्यादी महिला आंघोळ करत असताना त्याने लपून महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्याकडे पैशाची मागणी (Extortion Case) केली. सुरुवातीला त्याने 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने आणखी साडेतीन लाख रुपये मागितले.
तसेच पैसे दिले नाहीतर व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली.
आरोपीच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे (PSI Rahul Kolpe) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Threat to go viral on bathing video, rape by husband’s friend; Shocking incident in Pune

 

हे देखील वाचा :

MLA Nitesh Rane | भाजप आमदार नितेश राणेंच्या अडचणी वाढणार; निवडणूक आयोगासह पोलिसांकडे धमकी दिल्याप्रकरणी तक्रार

Year Ender 2022 | वर्ष 2022 मध्ये ‘हे’ 7 सुपरफूड्स होते ट्रेंडमध्ये, जाणून घ्या त्यांचे जबरदस्त फायदे

Pune Band News | शहरात शुकशुकाट; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

 

Related Posts