IMPIMP

Pune Crime | प्रांत अधिकारी असल्याचे सांगून तिघांची 2 लाखाची फसवणूक

by nagesh
Cheating

पुणे / दिघी (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)प्रांत अधिकारी (provincial officer) असल्याची बतावणी करुन बँकांनी जप्त केलेल्या चारचाकी गाड्या घेऊन देतो असे सांगून तिघांची फसवणुक केल्याचा प्रकार दिघीमध्ये घडला आहे. आरीपीने तीन जणांची 2 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi police station) एका विरोधात फसवणुकीचा गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तुषार मारुती ठिगळे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवदेशकुमार रमाकांत मिश्रा (वय-56 रा. बी/24, सुखवानी रेसीडेन्सी, गणेशनगर, दापोडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 25 मार्च 2020 ते 3 जानेवारी 2021 दरम्यान दिघी-आळंदी रोडवरील (Dighi- Alandi Road) परांडे नगर येथील माऊली मस्टी कार केअर सेंटर येथे घडला.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने प्रांत अधिकारी असल्याचे सांगून जुन्या गाड्यांचे लिलाव
करण्याची जबाबदारी आपल्याकडे असल्याचे सांगून जुन्या चारचाकी गाड्या घेऊ देतो असे फिर्यादी यांना
सांगितले. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 1 लाख 30 हजार रुपये घेतले. तसेच अक्षय पाटील यांच्या
आईकडून 41 हजार आणि संजय शेटे यांच्याकडून 42 हजार असे एकूण 2 लाख 13 हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही तुषार गाडी देत नसल्याने फसवणूक (Cheating) झाल्याचे लक्षात आल्यानंतर अवदेशकुमार मिश्रा यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

 

Web Title : pune crime three of them cheated rs 2 lakh by claiming to be provincial officials

 

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढविण्याबाबत आज आदेश काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Pimpri Crime | ‘मी बाहेर आल्यावर सोडणार नाही, पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस चौकीत धमकी’

Pooja chavan Suicide Case | पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा, संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ?

 

Related Posts