IMPIMP

Pune Crime | घरात थेट वीजचोरी अन् जनमित्रास मारहाण करणारा कंत्राटी कर्मचारी बडतर्फ

by nagesh
Pune Crime | Towards a contract employee who steals electricity directly from the house and beats his friends

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | वीजखांबावरून घरासाठी 21 हजार रुपयांची थेट वीजचोरी (Power Theft) करणाऱ्या व ही चोरी उघड करणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञासोबत (Senior Technicians) मारपीट (Beating) करणाऱ्या सुनील जाधव (Sunil Jadhav) या कंत्राटी कर्मचाऱ्यास (Contract Employee) महावितरणच्या (MSEDCL) सेवेतून मंगळवारी (दि. 12) बडतर्फ करण्यात आले आहे. यासोबतच जाधव विरुद्ध वीजचोरी (Pune Crime) केल्याप्रकरणी कलम 135 नुसार फौजदारी गुन्हा (Criminal Offense) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या मंचर विभाग (MSEDCL Manchar Division) अंतर्गत नारायण उपविभागमध्ये कार्यरत कंत्राटी (आऊटसोर्स) कर्मचारी सुनील भाऊ जाधव याच्या मु. पो. नंबरवाडी वारुळवाडी (ता. जुन्नर) येथील राहते घरी नारायणगावचे सहायक अभियंता ऋषिकेश बनसोडे (Assistant Engineer Rishikesh Bansode)
व वरिष्ठ तंत्रज्ञ रामदास बांबळे (Senior Technician Ramdas Bamble)
यांनी वीजयंत्रणेची तपासणी केली असता त्या ठिकाणी वीजखांबावरून केबलद्वारे थेट वीजचोरी (Pune Crime) सुरु असल्याचे आढळून आले.

 

पंचनामा केल्यानंतर कंत्राटी कर्मचारी सुनील जाधव याने राहत्या घरी गेल्या 24 महिन्यांपासून एकूण 1752 युनिटची म्हणजे 19 हजार 130 रुपयांची वीज चोरी केल्याचे निर्दशनास आले.
वीजचोरी व दंडासह एकूण 21 हजार 130 रुपयांचे वीजबिल घराचे मूळ मालक यांना देण्यात आले आहे.
या वीजचोरी प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station)
सुनील जाधव विरुद्ध भारतीय विद्युत कायदा (Indian Electricity Act)
2003 मधील कलम 135 नुसार फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान घरातील वीजचोरी उघडकीस आल्यानंतर कंत्राटी कर्मचारी सुनील जाधव याने महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ रामदास बांबळे यांच्यासोबत नारायणगाव येथे मारपीट केली व गंभीर स्वरुपाचे सार्वजनिक गैरवर्तन केले.
त्यामुळे प्राईमवन वर्कफोर्स कंत्राटदार संस्थेकडून (PrimeOne Workforce Contractor Organization)
कंत्राटी कर्मचारी सुनील जाधव विरुद्ध बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
त्याप्रमाणे जाधव याची महावितरणमधील कंत्राटी सेवा देखील तात्काळ समाप्त झाली आहे.

 

Web Title :-  Pune Crime | Towards a contract employee who steals electricity directly from the house and beats his friends

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कुख्यात गुन्हेगार सुरज ठोंबरे टोळीतील तडीपार गुन्हेगार अजिंक्य काळेला हत्यारासह गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा ! अटकेपासून तूर्तास संरक्षण, जाणून घ्या अटी व शर्थी

Sharad Pawar On Raj Thackeray | छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

 

Related Posts