IMPIMP

Shivsena | नवनियुक्त शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा काही तासांतच ‘या’ कारणामुळे राजीनामा

by nagesh
Eknath Shinde Vs Shivsena Uddhav Thackeray | shinde vs thackeray fight over shivsena political symbol bow and arrow election commission will consider affidavits  number of mla mp adv ujjwal nikam

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेला (Shivsena) लागलेली गळती अद्याप काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्हे, तालुका आणि महानगरपालिकांमधील शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते आणि पदाधिकारी वेगाने शिंदे गटात (Shinde Group) दाखल होत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटात सामील झालेल्या नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी (Expulsion) करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ तून तातडीने नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोकणात (Konkan) नव्याने नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांनीही अवघ्या काही तासात राजीनामे (Resignation) दिल्याचे समोर आले आहे. उपजिल्हाप्रमुखपदी नेमणूक झालेले प्रकाश रसाळ (Prakash Rasal) यांनी काही तासात राजीनामा दिला आहे.

 

प्रकाश रसाळ यांनी राजीनामा पत्रात लिहिलंय की, सामाना दैनिकातून जाहीर झालेल्या शिवसेना (Shivsena) उपजिल्हा प्रमुख पदाकरिता निवडीबाबत मला आनंद आहे. मात्र माझ्या प्रकृतीमुळे आणि कौटुंबिक समस्येमुळे मला या पदाला न्याय देता येणार नाही. त्यामुळे मी हे पद स्वीकारु शकत नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे, असं पत्र रसाळ यांनी रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके (Ratnagiri District Chief Vilas Chalke) यांच्याकडे पाठवले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एवढेच नाही तर रत्नागिरी युवा संघटक वैभव पाटील (Vaibhav Patil) यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. रत्नागिरी तालुक्याच्या युवा संघटकपदी नियुक्ती झाली होती. परंतु माझ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अडचणींमुळे या पदाचा राजीनामा देत आहे तो मंजूर करावा अशी विनंती वैभव पाटील यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना केली आहे. अलीकडेच आमदार उदय सामंत (MLA Uday Samant) यांच्या समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बापू म्हाप (Bapu Mhap), शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर (Bipin Bandarkar),
महिला आघाडी संघटक कांचन नागवेकर (Kanchan Nagvekar) यांना पदावरुन हटवण्यात आले होते.
त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी रत्नागिरीत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती.
मात्र, नव्या नियुक्तीनंतर काही तासांतच उपजिल्हाप्रमुख आणि युवा संघटक यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला मोठा झटका बसला आहे.

 

Web Title :- Shivsena | another blow to shiv sena at ratnagiri

 

हे देखील वाचा :

Pune Rains | पुण्याचा पाणीप्रश्न मिटणार; चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस

Ajit Pawar Meets Eknath Shinde | शिंदे-फडणवीस सरकारकडून बारामतीमधील विकासकामांना स्थगिती ?; अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Indore-Pune Bus Accident | इंदूरहून पुण्याकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात; 13 प्रवाशांचा मृत्यू

 

Related Posts