IMPIMP

Pune Crime | पुण्यात हप्ता वसुली ! विमानतळ पोलिसांकडून गुंडावर मोठी कारवाई

by nagesh
Pune Crime | From the old controversy, he sent obscene messages in the name of the woman and slandered her for having links with terrorists

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | टपरी चालवायची असेल तर दररोज ५०० रुपये हप्ता दयायचा नाही तर मारुन टाकील, अशी धमकी देऊन जबरदस्तीने ५०० रुपये घेऊन जाणार्‍या गुंडाला विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) अटक केली. करण हातागळे (वय २५, रा. यमुनानगर, विमाननगर) असे या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल रमेश ठोकळ (वय ३०, रा. धर्मनगर, चंदननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

राहुल ठोकळ यांची विमाननगर येथील मंत्री आयटी पार्क (Mantri IT Park) येथे चहाची टपरी आहे. करण हातागळे हा मंगळवारी सकाळी फिर्यादीच्या चहाच्या टपरीवर आला. फिर्यादी व त्यांचा कामगार इस्लास (वय २३) यांना “का रे तुम्हाला जास्त मस्ती आली काय” असे म्हणून “टपरी चालवायची असेल तर मला रोज ५०० रुपये हप्ता दयायचा तर टपरी लावायची पैसे देणार नसेल तर तुला येथे टपरी चालू  देणार नाही, “असे बोलला़ त्यावर फिर्यादी (Pune Crime) याने त्यास “तुला का पैसे दयायचे,” असे विचारल्यावर त्याने फिर्यादी व त्यांच्या कामगाराला शिवीगाळ करुन “पैसे नाही दिले तर मारुन टाकील,” अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने ५०० रुपये घेतले. विमानतळ पोलिसांनी हातागळे याला अटक (Pune Crime) केली असून पोलीस उपनिरीक्षक गांधले तपास करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | Viman Nagar Police Arrest One for 500 hafta wasuli per day

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बारामतीत पिळदार शरीरयष्टीसाठी इंजेक्शन विकणारा ‘गोत्यात’

Online Video Game | ‘ऑनलाइन गेम’मूळ आयुष्य गमावलं ! रुळावर बसून खेळत होते ‘गेम’, रेल्वे धडकल्यानं युवकांचे झाले ‘तुकडे-तुकडे’

Gold Price Today | सलग 3 दिवसांपासून घसरतोय सोन्याचा दर, जाणून घ्या 1 तोळ्याचा भाव

 

Related Posts