IMPIMP

Pune Crime | जातपंचायतीतून घटस्फोट का घेतला नाही म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत; 14 जणांवर FIR

by nagesh
 Pune Crime | rain of currency notes in cabin of a social welfare officer in pune zilla parishad office

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | वाकड येथील एक गलिच्छ घटना घडल्याचे समोर आले आहे. जात पंचायतीतुन घटस्फोट का घेतला नाही म्हणुन कुंटुंबाला जातीतुन समाजबहिष्कृत (Socially excluded) करण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना कायम वाढताना दिसताहेत. तीन वर्षांपासून वाळीत टाकले शुभकार्य आणि नातेवाईकांच्या अंत्यविधीला येण्यास बंदी देखील घातली. हा लाजिरवाणी प्रकार मार्च 2018 ते सप्टेंबर 2021 दरम्यान घडला. या प्रकरणावरुन एका 33 वर्षीय युवकाने याबाबत वाकड पोलिसात (Wakad police) फिर्याद (Complaint) दिली आहे. यावरून जात पंचायतीच्या पंचासह 14 जणांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला गेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीचे पत्नी सोबत कौटुंबिक वाद सुरू होते.
हे समजाविण्यासाठी बाजीराव वाघमारे आणि सासरे दिलीप भोरे हे गावचे पाटील, नातेवाईक,
पंच मंडळींसह फिर्यादीच्या घरी आले.
समाजात तुम्हाला कुठेच तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही.
इथुन पुढे तुम्हाला कुठल्याही सुख-दु: खात सहभागी होता येणार नाही, कोणीही कुंकु लावणार नाही (समाजबहिष्कृत) असा तोंडी ठराव करुन निघूूून गेले.
नंतर, फिर्याददाराने डिसेंबर 2018 साली कौटुंबिक कोर्टात घटस्फोटासाठी दावा दाखल
यानंतर पत्नीने फिर्यादीसह त्यांचे आई-वडील आणि मामावर मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दरम्यान, 29 डिसेंबर 2018 रोजी फिर्यादी लग्नाला गावी गेले असता तुम्हाला वाळीत टाकले असून तुमच्या सोबत संबंध ठेवणाऱ्यांनाही वाळीत टाकले जाईल असे वाळपत्र मैदर्गी (सोलापुर) येथील लग्नात सोडत कुंकु बंदचा ठराव करण्यात आला.
तर, 2019 साली वारजे माळवाडीत चुलत्यांच्या मृत्युंच्या 5 व्या दिवशीच्या तांब्यात पैसे टाकण्याच्या परपंरेस मनाई केली.
14 फेब्रुवारी 2019 रोजी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे मारहाण करुन फिर्यादीचा चष्मा फोडला.
त्यांच्याशी बोलणाऱ्या नातेवाईकांना वाळीत टाकण्याची धमकी दिली. मनुष्य जिवंत असल्याची जिवगंता (वर्गणी) बंद केली.
चुलत बहिणीच्या लग्न पत्रिकेत फिर्यादीच्या वडिलांचे नाव टाकले म्हणून पंचांनी चुलत्यांची सुध्दा वर्गणी घेणे बंद केलेत.

या दरम्यान, याप्रकरणी युवकाने दिलेल्या फिर्यादीवरुन (Complaint) पंचासह 14 जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, जातपंचायतीचे पाटील (पंच) करेप्पा मारुती वाघमारे व त्यांची तीन मुले बाजीराव वाघमारे,
साहेबराव वाघमारे, बाळकृष्ण वाघमारे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), मोहन उगाडे, मनोज सागरे,
विजय सागरे, रामदास भोरे, अमर भोरे, महादेव भोरे, मारुती वाघमारे, विष्णु वाघमारे, अमृत भोरे,
गोविंद वाघमारे या जात पंचायत चालविनाऱ्यांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.
दरम्यान पुराव्या अभावी पोलीस फिर्याद घेत नसल्याने साडेतीन वर्षांपासून हे कुटुंब अन्याय सहन करत होते. मात्र, अखेर वाकड पोलीसांनी (Wakad police) गुन्हा नोंद केला आहे.

 

Web Title : Pune Crime | wakad police a case has been registered against 14 people for throwing their family in the sand

 

हे देखील वाचा :

Earn Money | अवघ्या 5 हजार रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहिना होईल लाखो रूपयांची कमाई !

Pune Crime | खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार, केक शॉपमध्ये केला चोरीचा प्रयत्न

JSPM Pune Recruitment 2021 | जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे विविध पदांसाठी भरती

 

Related Posts