IMPIMP

Pune Crime | खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार, केक शॉपमध्ये केला चोरीचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime | Robbed of cash, including gold jewelry, at gunpoint; Sensational incident in indapur of Pune district

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोरट्याने गोळीबार केल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. स्थानिक नागरिकांनी या चोरट्याला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांकडून त्याच्याकडे सखोल (Pune Crime) चौकशी करण्यात येत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

साधारणपणे 45 वर्षांचा असलेला हा चोरटा चोरीच्या उद्देशाने खडक माळ आळी येथे आला होता. खडक माळ आळीमध्ये असलेल्या चर्चजवळ असलेल्या एका केक शॉपमध्ये चोरी करण्यासाठी गेला. चोरी करीत असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले. त्यावेळी चोरट्याने त्याच्याकडील बंदुकीमधून हवेत गोळी झाडली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तसेच गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी धावले. या चोरट्यावर अनेक गुन्हे दाखल असून काही गुन्ह्यांमध्ये तो फरार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या सोबतच तो येरवडा कारागृहातून फरार असल्याचे देखील समोर येत आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

Web Title : Pune Crime | firing incident in khadak police station area

 

हे देखील वाचा :

JSPM Pune Recruitment 2021 | जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे विविध पदांसाठी भरती

Sidharth Shukla | सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचं कारण अस्पष्टच? मुंबई पोलीस म्हणाले…

Crime News | नगर परिषदेचा निलंबित अधिकारी निघाला ‘कुबेर’; 3 फ्लॅट, महागड्या गाड्या, 12 तास सुरु होता छापा

 

Related Posts