IMPIMP

Pune Crime | अल्प दरात कर्ज मिळवून देतानाच कमिशनच्या आमिषाने तरुणाला बसला गंडा; कर्ज तर मिळाले नाही उलट ग्राहकांचे पैसे देण्याची आली वेळ

by nagesh
Pune Cyber Crime News | Hadapsar Police Station - 21 lakh fraud in the name of giving dealership of Ather Energy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | अल्प दरात कर्ज (Loan) मिळवून देतो, असे सांगून ग्राहक आणल्यास कमिशन (Commission) देतो, अशा आमिषाला बळी पडून एका तरुणाने ग्राहक मिळवून दिले. पण आता ते चांगलेच अडचणीत आले. ११ लाख १० हजार रुपयांची फसवणुक (Fraud Case) झाल्याचे समोर आले आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी प्रशांत पंदिकाने Prashant Pandikane (वय ४५, रा. येरवडा) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३१०/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राज संभाजी पाटील ऊर्फ किशोर Raj Sambhaji Patil alias Kishore (रा. स्रेहल कॉम्प्लेक्स, वारजे) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फ्रि लन्सींगचे (Free lancing) काम करत असतात.
त्यांची राज संभाजी पाटील यांच्याशी भेट झाली. त्यांनी आपण मिंडसेट फायनान्स कंपनीचा (Mindset Finance Company) मध्यस्थ म्हणून काम करतो. लोकांना कमी व्याज दरात कर्ज काढून देत असल्याचे सांगितले.
तुम्हालाही कर्ज काढून देईन. तुम्ही ग्राहक आणून दिले तर मला २ टक्के कमिशन मिळते. त्यातील अर्धे तुम्हाला देतो, असे आमिष दाखविले.
त्यानुसार फिर्यादी यांनी ५ ग्राहक त्यांना आणून दिले. त्यांना प्रत्येकी २ कोटी, १ कोटी, १५ लाख, ३० लाख कर्ज हवे होते.
त्यानुसार त्यांनी ४५ दिवसात कर्ज मंजूर होईल, असे सांगून प्रोसेसिंग फी म्हणून त्यांच्याकडे पैसे मागितले.
फिर्यादी यांनी तारणासाठी मालमत्तेची कागदपत्रे तसेच सर्वांचे मिळून ११ लाख १० हजार रुपये प्रोसेसिंग फी म्हणून गोळा करुन राज याला दिले.

 

त्यानंतर सप्टेबर २०२१ पासून तो फिर्यादी यांना टाळू लागला.
ते भेटायला गेले की त्यांना दिवसभर बाहेर बसवून ठेवू लागला.
ज्यांच्याकडून फिर्यादी यांनी कर्जासाठी पैसे घेतले होते,
त्यांचा तगादा लागल्याने मिंडसेट फायनान्स कंपनीच्या मुंबईतील नरीमन पॉईंट येथील मेकर चेंबरमध्ये गेले.
तेव्हा त्या ठिकाणी मिंडसेट फायनान्स नावाची कोणतीही कंपनी दिसून आली नाही.
आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचा संशय आल्याने त्यांनी राज पाटील याच्याकडे पैसे परत मागितले,
तेव्हा तो हमरीतुमरीची भाषा बोलू लागला.
त्यानंतर आता त्यांनी फसवणुकीची तक्रार दिली.
फिर्यादी यांनी एक टक्का कमिशनच्या आमिषाने राज पाटील यांना ग्राहक मिळवून दिले होते.
आता त्यांना कर्ज मिळाले नाही उलट त्यांनी फिर्यादीकडे पैसे दिले असल्याने त्यांचे पैसे परत देण्याची जबाबदारी मात्र त्यांच्यावर आली आहे.
वारजे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : – Pune Crime | While getting a loan at a low rate the young man got scammed by the lure of the commission The loan was not received but it was time to pay the customers

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार, जाणून घ्या कोणत्या भागात पाणी नाही

Pune Crime | पंतप्रधान मुद्रा फायनान्सचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक

Nitin Gadkari | ‘जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला…’, संसदीय बोर्डामधून गडकरींना वगळल्यानंतर काँग्रेसची भाजपवर खोचक टीका

 

Related Posts