IMPIMP

Sangli News | शिराळ्यातील फार्महाऊसवर सापडले तब्बल 19 जिवंत नाग; वन विभागाची कारवाई

by nagesh
Sangli News | sangli forest department seized 19 nag snakes from farmhouse

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन –   Sangli News| प्रसिद्ध असणारी सांगली (Sangli News) जिल्ह्यातील शिराळ्याची (Shirala ) नागपंचमी यंदा साध्या पद्धतीनेच करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे शिराळ्यात तब्बल 19 जिवंत नाग (19 snakes) एका फार्महाऊसवर सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात नाग सापडल्यामुळे शिराळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मडकी आणि पोती पिशवीत बंदिस्त करून ठेवलेले 19 नाग जप्त करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहेत. सदरची कारवाई शिराळ्याच्या वन विभागाने (Shirala Forest Department) केली आहे. दरम्यान, वन विभागाने संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत माहिती अशी की, अज्ञात फोनवरून फार्महाऊसमध्ये नाग बंदिस्त करून ठेवले असल्याची माहिती वन विभागाला (Shirala Forest
Department) मिळाली होती. या नागांचे प्रदर्शन होणार असल्याची माहिती वनविभागाला समजली. याबाबत माहिती मिळताच शिराळा येथील
वनक्षेत्रपाल, वनपाल वनरक्षक आणि सांगलीतील वनविभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली असता, दरम्यान तेथील काही लोक त्या
ठिकाणाहून पळून गेले.

 

या दरम्यान, वन विभागाच्या पथकाने संबंधित फार्महाऊसवर जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी अधिकाऱ्यांना तब्बल 19 जिवंत नाग सापडले. हे
सर्व नाग मडकी, पोती, पिशवीत ठेवल्याचे वन विभागाच्या पाहण्यात आले. दरम्यान, या नागाची वैद्यकीय तपासणी करण्यात आलीय. यांनतर त्यांना
सायंकाळी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. या प्रकरणी वन विभागाने (Shirala Forest Department) गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :  Sangli News | sangli forest department seized 19 nag snakes from farmhouse

 

हे देखील वाचा

DSK Group Cheating Case | फसवणूक प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाकडून कुलकर्णी कुटुंबाला मोठा दिलासा

Pune Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाडसह कुटुंबाविरोधात ‘मोक्का’ कारवाई

Pune Crime | सराईत चोरट्याकडून वाहन व मोबाईल चोरीचे 6 गुन्हे उघडकीस

 

Related Posts