IMPIMP

Pune Crime | इमारतीवरुन पडून कामगाराचा मृत्यु; बिल्डर, ठेकेदारावर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Worker dies after falling from building; Case registered against builder, contractor

पुणेसरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | सुरक्षेची कोणतीही साधने न वापरल्याने काम करताना पाय घसरुन इमारतीच्या डकमध्ये पडून
कामगाराचा मृत्यु (Death) झाला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) बिल्डर (Builder) व ठेकेदारावर (Contractor) गुन्हा (FIR) दाखल
केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मरिअप्पा मल्लय्या वनकेरी Mariappa Mallaya Vankeri (वय ३०, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे मृत्यु पावलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी साहेबराव मल्लय्या रामोशी Sahebrao Mallaiah Ramoshi (वय ४८, रा. जनता वसाहत) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०४१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ठेकेदार मुकुंद हनमंतराय रेड्डी (Mukund Hanmantarai Reddy) आणि बिल्डर राहुल नावंदर (Rahul Navander) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील टिळेकरनगरमधील द्वारिकाधाम सोसायटीतील चालू असलेल्या इमारतीच्या साईटवर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरु असताना ठेकेदार व बिल्डर यांनी साईटवर कामगारांच्या जिवीतांची कसल्याही प्रकारची काळजी घेतली नाही. बिल्डिंगच्या बाजूने सुरक्षा रक्षक नेट बांधले नाही.
त्यामुळे मरिअप्पा वनकेरी हा काम करीत असताना पाय घसरुन इमारतीच्या डकमध्ये पडून त्याचा मृत्यु झाला.
पोलीस उपनिरीक्षक सोनवणे (Police Sub-Inspector Sonwane) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Worker dies after falling from building; Case registered against builder, contractor

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde Group-BJP | राज्य सरकारच्या विविध समित्यांवरील नियुक्त्यांबाबत; शहर-जिल्हा भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांची झाली गुप्त बैठक

Kishori Pednekar | कोणाच्या कळा, कोणाचे बाळंतपण आणि कोणाच्या मांडीवर बाळ हे सर्वांना कळतं, किशोरी पेडणेकरांची राज ठाकरे आणि भाजपवर टीका

Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्यांना नाराज आमदारांना दिवाळीपूर्वी मिळणार महामंडळाचं गिफ्ट! प्रमुख मंत्र्यांची बैठक

 

Related Posts