IMPIMP

Pune Crime | चुलत भावाचा फोटो ‘डीपी’ला ठेवून तरुणाला 4 लाखांचा ‘गंडा’

by nagesh
Pune Crime | Young man gets Rs 4 lakh for posting photo of cousin to DP

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | व्हॉटसअ‍ॅपवरील डीपीवर (WhatsApp DP) चुलत भावाचा फोटो ठेवून त्याद्वारे कॉल करुन भारतातील मित्राला पैशाची गरज असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणाला 4 लाख रुपयांचा गंडा (Cheating) घातल्याचे समोर आले (Pune Crime) आहे.

याप्रकरणी पुणे विद्यापीठ कॉलनीत (Pune Vidyapeeth Colony) राहणार्‍या एका 53 वर्षाच्या व्यक्तीने सायबर पोलिसांकडे (Cyber Crime Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी बँक खातेदार, तसेच व्हॉटसअ‍ॅप वापरकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांचा चुलत भाऊ अमेरिकेत राहतो. 12 जुलै रोजी त्यांना एक व्हॉटसअ‍ॅप कॉल आला.
त्यावर त्यांचा चुलत भावाचा फोटो लावला होता.
त्यामुळे आपल्या चुलत भावाचा कॉल असल्याचा त्याचा समज झाला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पण, कॉलवर आवाज व्यवस्थित येत नव्हता. त्यामुळे त्यांना तो आवाज ओळखता आला नाही.
त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांच्या भावाच्या नावाने चॅटींग सुरु केले.
आपल्या भारतातील मित्राला वैद्यकीय कारणासाठी पैशाची गरज असल्याचे मेसेजवर सांगितले व त्यांना बँक खात्याची माहिती देऊन त्यावर 4 लाख रुपये ट्रान्सफर करायला सांगितले.
त्यानुसार त्यांना आपल्या चुलत भाऊ सांगतो, असे वाटून त्यांनी दिलेल्या अकाऊंटवर 4 लाख रुपये ट्रान्सफर केले.
त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा चुलत भावाशी संपर्क झाल्यावर त्यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक पाटील (Police Inspector Patil) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Young man gets Rs 4 lakh for posting photo of cousin to DP

 

हे देखील वाचा :

Pune Weather Update | पुण्यात आज ढगाळ वातावरण; दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता

Pune News | शिवणे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Kolhapur Crime | पुण्यातील चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी केली अटक

 

Related Posts