IMPIMP

Pune Crime | वडगाव शेरी येथील ‘वॉटर बे’च्या मागील मैदानात तरुणावर कोयत्याने वार; तिघा सराईत गुंडांसह 6 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Chain Snatching In Vishrantwadi Chowk Yerwada Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | भावाला शिवीगाळ केल्याच्या रागातून सराईत गुंडांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) तिघा सराईत गुंडांसह ६ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आदिल सय्यद (वय २२), संकेत थेऊरकर (वय १८), आतिश डिंगरे (वय २०), रोहित धाडवे (वय १८), अजय साळवे (वय २०), आदित्य कांबळे (वय २०, सर्व रा. वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. आदिल सय्यद, आतिश डिंगरे आणि रोहित धाडवे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील (Pune Criminals) गुन्हेगार आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी सईद जाकीर शेख (वय २५, रा. वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे.
ही घटना वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील वॉटर बे सोसायटीच्या (Waterbay Society) मागील मैदानात रविवारी रात्री सव्वादहा वाजता घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व संकेत थेऊरकर याच्याबरोबर वाद झाला होता.
त्यावेळी शेख यांनी त्याला शिवीगाळ केली होती.
शेख हे मोटारसायकलवरुन घरी जात असताना टोळक्याने त्यांना अडविले.
आदिल सय्यद याने काल तू संकेत यास शिवीगाळ केली़ तो माझा भाऊ आहे, तुला बघुन घेतो, असे बोलून फिर्यादीला शिवीगाळ केली.
इतर आरोपींनी फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता नाकावर, कपाळावर मारुन गंभीर जखमी केले आहे.
जाताना कोयते हवेत फिरवून लोकांमध्ये दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक करपे अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Young man stabbed near Waterbay Society at Wadgaon Sheri A case has been registered against a gang of 6 persons including three goons in yerwada police station

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘शरद पवारांना सुप्रिया सुळेंना थेट मुख्यमंत्री करता येत नसल्याने संजय राऊतांना…’, चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान

Pune River Rejuvenation Project | मुळा- मुठा नदी सुधार प्रकल्प ! बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या पीपीपी तत्वावरील ६५० कोटी रुपयांच्या कामासाठी 2 कंपन्यांच्या निविदा

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले – ‘भगव्या झेंड्याच्या रक्षणाची जबाबदारी आता आपली’

 

Related Posts