IMPIMP

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले – ‘भगव्या झेंड्याच्या रक्षणाची जबाबदारी आता आपली’

by nagesh
Winter Session 2022 | devendra fadnavis first comment after lokayukta bill passed in assembly session

नाशिक :  सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (Telangana CM KCR) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. बिगर-भाजप (BJP) आघाडी करण्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीनंतर, चंद्रशेखर राव (Chandrasekhar Rao) यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकार (Thackeray Government) सुडाचे राजकारण करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. ते औरंगाबाद (Aurangabad) येथे बोलत होते. यानंतर नाशिक दौऱ्यावर गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवशेनेवर (Shivsena) टीकास्त्र सोडले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

देशाला मार्गदर्शन देणाऱ्या भगव्या झेंड्याची जबाबदारी आता भाजपवरती आली असून भाजपने ही जबाबदारी स्वीकारली आहे. भगव्या झेंड्याचे रक्षण करुन समाजाला न्याय देण्यासाठी सतत झगडत राहू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिकमधील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला. नाशिक (Nashik) येथे भाजपाच्या कार्यकर्ता मेळावा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षरित्या टीकेचे बाण चालवले.

 

आज काही जणांनी भगवा झेंड्याच्या नावाखाली वेगळी कामे सुरु केली आहेत, आता या भगव्या झेंड्याचे रक्षण (Protection) करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली आहे. कारण भगवा हा शिवछत्रपतींचा आहे, शिवछत्रपती महाराज हे महाराष्ट्राचा आदर्श आणि दैवत आहे. त्यांच्या झेंड्याचा अपमान करणाऱ्यांना आता समाजामध्ये कोणतेही स्थान उरलेले नाही, अशा शब्दात फडणवीसांनी शिवसेनेवर टिका केली.

राज्य सरकार फक्त मुंबईपुरते
राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कारण राज्य सरकार हे मुंबईबाहेर कुठेही लक्ष देण्यास तयार नाही.
तीन पक्षांचे सरकार आहे, परंतु त्यांची तोंडे तीन दिशेला आहेत.
आज कोणत्याही विकासात्मक कामांवर निर्णय होत नाहीत, याचा खेद वाटत आहे.
राज्य सरकार (State Government) हे फक्त मुंबईपुरते मर्यादीत असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्य सरकार सुडाचे राजकारण करतेय
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिका (BMC) कारवाई करणार आहे.
यावर बोलताना फडणवीस म्हणाले, हे आघाडी सरकार सुडाचे राजकारण करत आहे. मात्र, न्यायालय आहे.
त्या संदर्भात योग्य कार्यवाही करेल, असंही फडणवीस म्हणाले. राणेंवर कारवाई झाली, त्यांच्या मुलाबाबत काय झाले.
सोमय्यांचा कशा पद्धतीने जीव घेण्याचा प्रयत्न झाला. रवी राणांबाबत (Ravi Rana) काय चालले आहे, हे सगळे जनता पाहत आहे.
सुडाचे राजकारण कोण करत आहे सर्वजण पहात आहे. सरकारची सुडाची भावना त्यातून पुढे येत आहे, असे फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadanvis the responsibility of protecting the saffron flag is now yours fadnaviss attack on shiv sena

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 54 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Municipal Corporation (PMC) | स्थायी समितीच्या मुदत संपलेल्या 8 जागांवर नवीन नियुक्त्या

Kaviya Maran | हैदराबादची मालकिण काविया मारन खूष ! 10 कोटी मोजलेल्या ‘त्या’ खेळाडूने दाखवला ‘ट्रेलर’, IPL मध्ये पाहायला मिळणार खरा ‘पिक्चर’?

Rice Production | भारतात तांदळाचे विक्रमी उत्पादन, बासमती तांदळाचे भाव वधारले

PM Kisan Samman Yojana | PM किसान योजनेत महत्त्वाचे 2 बदल, जाणून घ्या

PMC JICA Project | मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाची कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण, खासदार गिरीश बापट यांच्या पाठपुराव्यास मोठे यश

Punyabhushan Award | पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी ‘सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कारा’चे वितरण

 

Related Posts