IMPIMP

Pune Crime | पुण्यातील तरुणीचा पोलीस चौकीत राडा ! अश्लिल शिवीगाळ करत पोलिसांचा गणवेश फाडला

by nagesh
Pune Crime | young woman from Pune doing wrong things in the police station! He tore the police uniform with obscene language

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीने आणि तरुणीच्या आईने पोलीस चौकीत गोंधळ घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. याप्रकरणी तरुणीवर पुण्यातील (Pune Crime) वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवार (दि.2) दुपारी दोन ते चार या दरम्यान कर्वेनगर पोलीस चौकीत (Karve Nagar Police Chowki) घडला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

21 वर्षीय युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस नाईक सुष्मा कल्याण घोळवे Sushma Kalyan Gholve (वय-33) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्या दामिनी मार्शल (Damini Marshall) ड्युटीवर आहेत. रविवारी दुपारी आरोपी तरुणी तिची आई आणि भाऊ हे कर्वेनगर पोलीस चौकीत (Karve Nagar Police Chowki) तक्रार देण्यासाठी आले होते. आरोपी तरुणी तक्रार न देता वारजे चौकीत गेली. वारजे चौकीत तिची तक्रार नोंदवून घेऊनही कर्वेनगर चौकीत येऊन ‘पोलीस माझे काहीही वाकडे करु शकत नाहीत’ असे म्हणत तिने आणि तिच्या आईने आरडाओरडा करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. (Pune Crime)

यावेळी फिर्यादी यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी तरूणीने अश्लिल शिवीगाळ करत फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच चौकीचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक रायकर यांनाही अर्वाच्च भाषेत ‘ए तु हो बाजुला’ असे म्हणत त्यांच्या गणवेशावर लावलेला ‘स्टार लावलेला बेल्ट’ तोडला. पोलीस करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली कथले (PSI Sonali Kathle) या करीत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Pune Crime | young woman from Pune doing wrong things in the police station! He tore the police uniform with obscene language

 

हे देखील वाचा :

BSNL ने दिला Jio-Airtel-Vi ला जबरदस्त धक्का! कमी किमतीत 28 दिवसापर्यंत रोज मिळवा 2GB डेटा आणि भरपूर काही

Pune Corona | पुणेकरांनो सावधान ! दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोकं ‘कोरोना’बाधित

Sleeping On Stomach | तुमच्या मुलांना देखील आहे पोटावर झोपून वाचण्याची आणि खेळण्याची सवय? सावधान, नंतर होऊ शकतात ‘या’ 5 गंभीर समस्या..

 

Related Posts