IMPIMP

Pune Crime | कुत्रा आईच्या अंगावर भुंकला म्हणून चौघांनी केली तरुणीला बेदम मारहाण

by nagesh
pune crime youth girl beaten four people due dog barking mother incidents kothrud

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Pune Crime | एका तरुणीने ज्या कुत्र्याला खायला टाकले, तो कुत्रा आईवर भुंकल्याने चिडलेल्या चौघा जणांनी त्या तरुणीला जबर मारहाण केली आहे. ही घटना पुण्यातील कोथरूड या ठिकाणी घडली. याप्रकरणी कोथरुड पोलिसांकडून (Kothrud Police) या चौघां जणांवर गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. राजाराम मारुती चौधरी, त्यांची आई मालुबाई चौधरी, पत्नी बायडा राजाराम चौधरी आणि मंदाकिनी चौधरी (हे चोघे रा. म्हातोबानगर, कोथरुड, पुणे) अशी गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत माहिती अशी की, निशा पंडित थरकुडे (वय 40, रा. म्हातोबानगर, कोथरुड, पुणे) यांनी
याप्रकरणी फिर्याद दिलीय. फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहण्यास आहेत. फिर्यादी निशा यांनी 30 डिसेंबर 2020 रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास एका कुत्र्याला खायला टाकले होते. त्यावेळी ते कुत्रे राजाराम चौधरी यांच्या आईच्या अंगावर भुंकले. या भुंकलेल्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी निशा यांना शिवीगाळ करुन डाव्या हाताची करंगळी पकडून जाेरात वाकवली. तस करत त्यांना गंभीर दुखापत केली. म्हणून फिर्यादींचे शारिरीक आणि आर्थिक नुकसान झाले आहे. म्हणून हा गुन्हा दाखल केला गेला.

 

 

या दरम्यान, फिर्यादी निशा पंडित थरकुडे (Nisha Pandit Tharkude) यांनी हा प्रकार घडला तेव्हा
कोथरुड पोलिसांकडे (Kothrud Police) तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रारीची चौकशी व्हावी,
यासाठी त्यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला आहे.

 

Web Title : pune crime youth girl beaten four people due dog barking mother incidents kothrud

 

हे देखील वाचा :

Sangli News | इस्लामपुरातील राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांचे अपघाती निधन

Tokyo Olympics 2020 | मीराबाई चानूला मिळू शकतं सिल्व्हरच्या बदल्यात गोल्ड मेडल ! जाणून घ्या का आणि कसे

Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी मोठी भरती; आजच करा अर्ज

 

Related Posts