IMPIMP

Pune Cyber Crime | गंडविण्यासाठी सायबर चोरट्यांची अफलातून ‘आयडिया’; चित्रकाराला घातला 80 हजारांचा गंडा

by nagesh
Pune Crime | 2 lakh withdrawn from credit card account by sending link to Cpoints app, FIR against person in Delhi for financial fraud

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Cyber Crime | लोकांना गंडा घालण्यासाठी सायबर चोरटे काय काय कल्पना लढवतील, हे काही सांगता येत नाही. यापूर्वी मैत्री करुन गिफ्ट पाठविल्याचे भासवून कस्टमच्या नावाने नागरिकांना लाखो रुपयांना लुटले जात असतानाच आता गंडविण्यासाठी सायबर चोरट्याने आणखी एक आयडिया अवलंबिली असल्याचे उघडकीस आले आहे. त्याद्वारे सायबर चोरट्याने एका चित्रकाराला ( Painter) तब्बल ८० हजारांची ‘टोपी’ घातली (Pune Cyber Crime) आहे.

याप्रकरणी एका ५४ वर्षाच्या चित्रकाराने दत्तवाडी पोलीस ठाण्यात Dattawadi Police Station (गु. र. नं. २४१/२१) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चित्रकार असून ते पर्वती पायथा (parvati pune) येथे राहतात. पायल पाठल असे नाव सांगणार्‍या एका महिलेचा त्यांना १ मे २०२० रोजी ई मेल आला होता. त्यात त्यांना एक फोटो दाखवून पेंटिंग काढायचे असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांच्या नावाने तामिळनाडु मर्कटाईन बँकेचा (Mercantile Bank of Tamil Nadu) एकूण १ लाख २८ हजार ५०० रुपयांचा चेक काढण्यात आला. या चेकचा फोटो त्यांना दुसर्‍या दिवशी पाठविण्यात (Pune Cyber Crime) आला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

त्यानंतर केल्विन ग्रे नाव सांगणार्‍याने त्यांना फोन करुन चेक कस्टम विभागात (customs department) अडकला असून तो सोडविण्यासाठी त्यांना वेळोवेळी पैसे भरण्यास सांगण्यात आले. १ लाख २८ हजार ५०० रुपयांच्या चेकच्या फोटोवर विश्वास ठेवून या चित्रकाराने तब्बल ८० हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार (Pune Cyber Crime) अर्ज दिला होता. त्याचा प्राथमिक तपास होऊन आता तो गुन्हा (Pune Cyber Crime) दाखल झाला आहे.

 

Web Title: Pune Cyber Crime | Cyber thieves idea to ruin; The painter put 80 thousand gangs

 

हे देखील वाचा :

BJP MP Raksha Khadse | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंविरूध्द निवडणूक लढविणार्‍या भाजपच्या खा. रक्षा खडसेंना मोठा धक्का

Pune Crime | पुण्यात सुनेने चुलीतील जळक्या लाकडाने सासर्‍याला केली मारहाण; बारामती तालुका पोलिस ठाण्यात FIR

Pune Crime | ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन पुण्यातील 28 वर्षीय तरूणीवर बलात्कार; कॉलेज कॅम्प्समध्ये पॉर्न व्हिडिओ दाखवून केली जबरदस्ती

Product Data Analysts | कोणत्याही पदवीशिवाय मिळवू शकता 61 लाख रुपयांची नोकरी, केवळ करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या

 

Related Posts