IMPIMP

Pune Crime | पुण्यात सुनेने चुलीतील जळक्या लाकडाने सासर्‍याला केली मारहाण; बारामती तालुका पोलिस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime | murder of a woman who refuses to have an affair the accused fled after throwing the body in the bathroom in lohegaon of vimannagar police station limits

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | माहेरहून पैसे, सोनेनाणे घेऊन ये, या कारणासाठी सुनेचा छळ केल्याचा प्रकार आपण नेहमी पाहतो. पण बारामती तालुक्यात (Baramati) एका सुनेने आपल्या सासर्‍याला चुलीतील जळक्या लाकडाने मारहाण करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

याबाबत पोपट दिनकर गाडेकर (वय 56, रा. बर्‍हाणपूर, ता. बारामती) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात Baramati Taluka Police Station (613/21) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांची सून दिपाली नानासो गाडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट गाडेकर यांना दोन मुले असून त्यांची लग्ने झाली आहेत. गाडेकर यांची 15 एकर जमीन आहे. या जमिनीच्या वाटणीवरुन त्यांच्या घरात वाद सुरु आहे. बुधवारी सकाळी गाडेकर हे घरी असताना त्यांची धाकटी सून दिपाली हिने गाडेकर यांना माझ्या नावावर जमीन करुन द्या, असे सांगितले. त्याला पोपट गाडेकर यांनी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या दिपाली हिने समोरच असलेल्या चुलीतील जळके लाकुड घेतले व त्याने पोपट गाडेकर यांच्या डोक्यात, उजव्या खांद्यावर त्या जळक्या लाकडाने मारहाण केली. त्यानंतर हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पोपट गाडेकर यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या सूनेविरुद्ध तक्रार (Pune Crime) दिली आहे. पोलीस हवालदार पाटसकर तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | In Pune, a daughter-in-law was beaten with a burning wood to father in law ; FIR in Baramati Taluka Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन पुण्यातील 28 वर्षीय तरूणीवर बलात्कार; कॉलेज कॅम्प्समध्ये पॉर्न व्हिडिओ दाखवून केली जबरदस्ती

Product Data Analysts | कोणत्याही पदवीशिवाय मिळवू शकता 61 लाख रुपयांची नोकरी, केवळ करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या

रतन टाटा यांच्या TCS ला 7 व्यावसायिक दिवसात झाला 1.41 लाख कोटी रुपयांचा तोटा, गुंतवणुकदारसुद्धा झाले हैराण

 

Related Posts