IMPIMP

Pune District Court | ‘महिला वकिलांनी कोर्टात केस नीट करू नयेत, लक्ष विचलित होते’ म्हणत पुणे जिल्हा कोर्टाने काढली नोटीस

by nagesh
Pune Crime News | The district and sessions court granted bail to the accused in the murder even before the charge sheet was filed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  महिला वकिल (Women Lawyers) कोर्ट सुरु असताना केस सावरतात किंवा नीट करतात यामुळे कोर्टाचे लक्ष विचलित होते, यामुळे कोर्टाचे कामकाज सुरू असताना महिलांनी केस नीट करू नये, अशी नोटीस (Notice) पुणे जिल्हा कोर्टाने (Pune District Court) काढली होती. सध्या ही नोटीस मागे घेण्यात आली असली तरी ती सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाल्याने याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. महिला वकील कोर्ट सुरू असताना केस नीट करतात हे देखील यानिमित्ताने अनेकांना समजले. तर काहींनी या नोटीशीवर (Pune District Court) नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

20 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, महिला वकील कोर्टात केस सावरतात, त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिला वकिलांनी कोर्टाची कार्यवाही सुरु असताना असे काही करु नये. यासोबतच नोटीसवर पुणे जिल्हा न्यायालयाच्या (Pune District Court) रजिस्ट्रार यांची स्वाक्षरी आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह (Senior Advocate Indira Jaising) यांनी नोटीशीवर ट्विट करत म्हटले आहे की, आता बघा! महिला वकिलांकडून कोण आणि का विचलित होत आहे. या ट्विट सोबत जयसिंग यांनी कोर्टाच्या नोटीशीचा फोटो जोडला होता.

महिलांनी ही कृती केल्याने न्यायालयाच्या कार्यवाहीत लक्ष विचलित होते आणि न्यायालयाच्या सुनावणीत अडथळा येतो, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. वरिष्ठ महिला वकिलांनी हा मुद्दा समोर आणला तेव्हा या प्रकरणाने जोर धरला.

 

 

दरम्यान, एका वृत्तानुसार आमच्या कार्यालयाला अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही असे
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष (Pune Bar Association President) अ‍ॅडव्होकेट पांडुरंग थोरवे
(Advocate Pandurang Thorve) यांनी स्पष्ट केले आहे. वकिलांना बजावलेल्या सर्व नोटिसा पुणे बार असोसिएशनला पाठवल्या जातात, मात्र आजपर्यंत अशी कोणतीही नोटीस आम्हाला मिळालेली नाही. या नोटीसवर शनिवारी आक्षेप घेतल्यानंतर ही नोटीस तात्काळ मागे घेण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune District Court | pune district court notice asks women lawyers not to fix their hair in court

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कात्रज तलावात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

MP Shrikant Shinde | मनसे- शिंदे गटाची युती? श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला

MNS | फटाक्यांवरुन पोलिसांत तक्रार करणाऱ्या मुस्लीम व्यक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक

 

Related Posts