IMPIMP

Pune Ganeshotsav | गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पुण्यात 10 दिवस जमावबंदी लागू

by nagesh
Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Ganeshotsav | उद्या गणरायाचं आगमन होत आहे. गणरायाच्या आगमनासाठी सर्वच भक्तमंडळी सज्ज आहेत. यंदाही उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदाचा गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) साधे पणाने साजरा करा असे आवाहन राज्य शासनाकडुन (State Government) देण्यात आले आहे. या उद्देशाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी पुण्यात (Pune) गणेशोत्सवाचे 10 दिवस जमावबंदी अर्थात 144 कलम (Article 144) लागु करण्यात आले आहे. गणेशाच्या आगमनापासुन म्हणजेच उद्यापासुन अर्थात 10 ते 19 सप्टेंबर या कालावधीत जमावबंदी लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Ravindra Shisve) यांनी दिला आहे.

 

पुणे शहर पोलीसांनी (Pune City Police) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी (Pune Ganeshotsav) आचारसंहिता तयार केलीय. बंदोबस्तावरील पोलिसांकडून या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उत्सवासाठी लोक बाहेर पडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. या पार्श्वभुमीवर यंदा गणरायाचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका निघणार नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी 144 कलम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पोलिस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यास तसेच, संचार करण्यास मनाई असे आदेश लागू केले आहेत. आगामी 10 दिवस हे आदेश लागू राहणार असून याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीसांकडुन सांगण्यात आलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शहरातील गणेश मंडळांनी साध्यापद्धतीने उत्सव साजरा करण्यास करण्यास सहमती दर्शविली आहे. मंडळांनी आचरसंहितेचे पालन करून सर्वोतोपरी पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी देखील आपली एक सामाजिक जबाबदारी समजून स्वयंशिस्त पाळून पोलिसांना सहकार्य करावे असंही सांगितलं आहे. दरम्यान, पोलिसांकडून बंदोबस्ताच्या ठिकाणी मनुष्यबळ तैनात करण्यात आले असले तरी, महत्वाच्या ठिकाणावर CCTV कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. गर्दीची ठिकाणे, महत्वाची मंडळी यांची मंदिरे व मंडपात कॅमेरे लावण्यात येणार आहे.

 

 

गणेशोत्सवासाठी असा असणार बंदोबस्त –

सुमारे 7 हजार पोलिस कर्मचारी

700 अधिकारी

शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियत्रण कक्ष राज्य राखीव पोलिस दलाच्या, तुकड्यांचा समावेश.

 

 

गुन्हे शाखेचा देखील वेगळा बंदोबस्त –

प्रत्येक पथकामध्ये 100 कर्मचारी

बॉम्ब शोधक व नाशक पथक

घातपात विरोधी कारवाईसाठी विशेष शाखा

वाहतूक पोलिस

 

Web Title : Pune Ganeshotsav | curfew imposed pune during ten days ganeshotsav violation rules will result action

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 44 वर्षीय मोलकरणीशी घरमालकानं शरीर संबंध ठेवले, व्हिडीओ घरकाम करणार्‍या महिलेच्या पतीला पाठवला अन्…

Bombay High Court | मुंबई उच्च न्यायालयाचा कंगनाला दणका ! सुशांत सिंह प्रकरणातील याचिका फेटाळली

Pune | मनोहर मामा आणि त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करा – मअनिस

 

Related Posts