IMPIMP

Pune | मनोहर मामा आणि त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करा – मअनिस

by nagesh
Pune | Arrest Manohar Mama Bhosale and his accomplices immediately - maharashtra andhashraddha nirmoolan samiti

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune | आपल्याकडे काही दैवीशक्ती असून आपण कॅन्सर (Cancer) बरा करू शकतो असा दावा करणाऱ्या मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा (Manohar Mama) याच्यावर आज (गुरुवार) महाराष्ट्र अंनिसच्या (Maharashtra Annis) सततच्या पाठपुराव्याने पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) बारामती पोलीस स्टेशन (Baramati Police Station) येथे गुन्हा (FIR) दाखल झाला. भोंदू मनोहर मामाला तात्काळ अटक (Arrest) करावी अशी मागणी मअनिसने केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

ह्या बाबतीत सविस्तर माहिती अशी कि, गेल्या पाच वर्षाच्या पासून मनोहर भोसले (Manohar Bhosle)
या युवकाने बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) करमाळा तालुक्यातील (Karmala taluka) उंदरगाव येथे आपल्याकडे दैवीशक्ती असल्याचा आभास निर्माण करून स्वत:चे आश्रम सुरु केले होते.
तो बाळूमामांचा (Balumama) अवतार असल्याची चर्चा घडवून आणल्यामुळे अनेक लोक
आपले असाध्य रोग किंवा आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्याकडे येत होते.
त्यांच्याकडून पाच हजार, अकरा हजार किंवा एकवीस हजार अशा स्वरुपाची पावती फाडली जात होती. त्यानंतर त्यांचे प्रश्न मनोहर भोसले हा त्याच्या दैवीशक्तीने सोडवू शकतो असे सांगून फसवणूक (Cheating) करत होता.

 

दरम्यान तक्रारदार शशिकांत खरात (Shashikant Kharat) यांच्या वडिलांना घशाच्या कर्करोगाने ग्रासले असता आजुबाजूच्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी मनोहर भोसले याला दाखवले.
आपण हा कर्करोग बरा करू शकतो असा दावा मनोहरबाबाने करून शशिकांत खरात यांना चार
अमावस्या करण्यास तसेच कर्करोग बरा करण्यासाठी पाण्यातून भंडारा पिणे आणि वरून बाभळीचा
पाला लावणे असे अघोरी उपचार सांगितले.
तसेच शस्त्रक्रिया (Surgery) न करण्याचा देखील सल्ला दिला.
तसेच वडिलांचा कर्करोग विना शस्त्रक्रिया बरा करण्यासाठी एक लाख रुपयाचा चढावा ठेवण्यास देखील सांगितले होते.

 

यातील कुठल्याच गोष्टीचा काहीही उपयोग न झाल्याने शशिकांत खरात यांनी त्यांच्या वडिलांचे ऑपरेशन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार शशिकांत खरात यांनी आपले पैसे परत मागितले. त्यावर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असे त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे.
मनोहर भोसले सोबत इतर दोघांच्यावर देखील जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

महाराष्ट्र अंनिस मार्फत मनोहर बाबाच्या विरोधात तक्रारीचे सत्यशोधन करण्यासाठी सोलापूर
येथे सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती.
त्या मार्फत अशोक कदम,निशा भोसले, केदारीनाथ सूरवसे, विनायक माळी, अरुण कोरे यशवंत फडतरे,अंजली नानल,लता ढेरे यांच्या समितीकडे शशिकांत खरात यांनी प्रथम अपले गाऱ्हाणे मांडले होते. जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत (Anti witchcraft laws) दैवी चमत्काराचा दावा करणे आणि त्याद्वारे लोकांना फसवणे हा गुन्हा असल्याने महाराष्ट्र अंनिसच्या नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, हमीद दाभोलकर (Hamid Dabholkar) यांनी या तक्रारी विषयी पुणे ग्रामीणचे (Pune Rural) पोलीस अधीक्षक
अभिनव देशमुख (SP Abhinav Deshmukh) यांच्याकडे शशिकांत खरात यांच्या सोबत तक्रार दाखल केली.

 

यामध्ये गांभीर्यने लक्षात घेवून अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Additional Superintendent of Police Milind Mohite) यांच्या देखरेखी खाली बारामती पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी बारामती अनिसचे कार्यकर्ते ज्ञानदेव सरवदे, सुभाष सोळंकी, आकाश दामोदरे, गोपी खैरनार,
राहुल केदारी हे उपस्थित होते.
अशा स्वरूपाच्या आणखी काही फसवणुकीच्या तक्रारी असल्यास पोलीस स्टेशनशी किंवा महाराष्ट्र अंनिसशी संपर्क करावा असे आवाहन यावेळी महाराष्ट्र अंनिस तर्फे करण्यात आले.
तसेच मनोहर मामा आणि त्याच्या साथीदारांना तातडीने अटक करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : Pune | Arrest Manohar Mama Bhosale and his accomplices immediately – maharashtra andhashraddha nirmoolan samiti

 

हे देखील वाचा :

Mobile SIM | खुशखबर ! तुमच्याकडे सुद्धा आहे का ‘या’ कंपनीचे सिम? तर फ्रीमध्ये मिळेल 4 लाखाचे बेनिफिट, असा घ्या फायदा

Social Media | उकळत्या पाण्यात हात जोडून बसला निष्पाप बालक, 23 सेकंदाच्या Video ने लोकांना केले ‘हैराण’

ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात

 

Related Posts