IMPIMP

Pune Hadapsar Crime | सराईत गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हडपसर परिसरातील घटना

by sachinsitapure
Pune Rape Case

पुणे : – Pune Hadapsar Crime | ओळखीचा गैरफायदा घेऊन एका सराईत गुन्हेगाराने एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला (Pune Minor Girl Rape Case). यातून ती गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार जानेवारी 2023 त मार्च 2024 या कालावधीत हडपसर परिसरातील शिंदे वस्ती (Hadapsar Shinde Vasti) येथे घडला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार (Criminal On Pune Police Records) असून तो सध्या अमरावती जेलमध्ये (Amravati Jail) आहे.

याबाबत 17 वर्षाच्या पीडित मुलीने बुधवारी (दि.20) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन तुषार कैलास काकडे Tushar Kaillas Kakade (वय-20 रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन/आय, सह पोक्सो अॅक्ट नुसार (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील (PSI Kaviraj Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी
एकाच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीसोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.(Pune Hadapsar Crime)

आरोपी तुषार काकडे हा दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार आहे.
त्याने साथीदारांसह कोयता, चाकु या सारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे
केले आहेत. तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपी तुषार काकडे याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत
कारवाई करुन एक वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील करीत आहेत.

Pune Lok Sabha Election 2024 | संशयास्पद बँक व्यवहारांची माहिती बँकांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ द्यावी – जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

Related Posts