IMPIMP

Pune Koregaon Park Crime | सिगारेट घेण्यावरुन तरुणाला मारहाण, सहा जणांना अटक; कोरेगाव पार्क परिसरातील घटना

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Koregaon Park Crime | सिगारेट घेण्याच्या कारणावरुन शाब्दिक बाचाबाची होऊन सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच पहाटेच्या सुमारास दुकानावर दगडफेक करुन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली (CCTV cameras were vandalized by pelting stones at the shop). याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police Station) सहा जणांना अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.17) रात्री सात आणि सोमवारी (दि.18) पहाटे तीनच्या सुमारास कोरेगाव पार्क भागातील लेन नं. 7 येथील प्रेम सुपर मार्केट येथे घडला आहे.

याबाबत प्रकाश नेमाराम चौधरी (वय-24 रा. रश्मी अपार्टमेंट, कोरेगाव पार्क) यांनी सोमवारी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुधीर बाहुसाहेब साठे (वय-38), ओंकार ज्ञानेश्वर पवार (वय-24), दिनेश मारुती दिवटे (वय-22), रविंद्र नवनाथ गाडे (वय-38), प्रथमेश प्रमोद पाटोळे (वय-19), ऋतिक किशोर पवार (वय-24) यांना अटक केली आहे. तर सचिन साठे याच्यावर आयपीसी 323, 324, 506, 427, 143, 146, 147, 149, 447, 452 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Koregaon Park Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविवारी रात्री सातच्या सुमारास फिर्यादी यांच्या दुकानात सिगारेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी फिर्य़ादी व आरोपी सुधीर साठे यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यावेळी सुधीर याने तुला बघुन घेतो असे म्हणून फिर्यादी यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर काही वेळाने आरोपी सुधीर तीन ते चार जणांना घेऊन फिर्य़ादी यांच्या दुकानात आला.

आरोपींनी फिर्यादी यांना दुकानातून बाहेर ओढले. तसेच फिर्यादी यांच्या दाजींना देखील दुकानातून बाहेर ओढून मारहाण
करुन जखमी करुन निघून गेले. आरोपी सुधीर याचा भाऊ सचिन साठे याने पहाटे तीनच्या सुमारास त्याच्या साथीदारांना
घेऊन आला. त्यांनी फिर्यादी यांच्या दुकानाच्या शटरवर दगडफेक केली.
तसेच दुकानाबाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा तोडून नुकसान केले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक गुन्हे चेतन मोरे,
सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धिरज कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धिरज कांबळे करीत आहेत.

Pune Sinhagad Road Crime | धक्का लागल्याच्या कारणावरुन कारची तोडफोड, सिंहगड रोड परिसरातील प्रकार

Related Posts