IMPIMP

Pune Pimpri Crime | शस्त्र परवान्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 9 लाखांची फसवणूक; वाकड परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Crime | मी मुंबई मंत्रालयात (Mumbai Mantralaya) असतो, गृह विभागातील (Home Department) कामे पाहतो असे सांगून तुम्हाला शस्त्र परवाना (Arms License) मिळवून देतो असे सांगून एका व्यावसायिकाला 9 लाखांचा गंडा (Fraud) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) जानेवारी 2019 ते डिसेंबर 2022 या कालावधीत तापकीरनगर, काळेवाडी येथे घडला आहे.

 

याबाबत प्रसाद उर्फ दिगंबर तुकाराम फुगे Prasad alias Digambar Tukaram Fuge (वय 27, रा. भोसरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) शुक्रवारी (दि.9) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राज उर्फ धनराज बाळू गायकवाड Raj alias Dhanraj Balu Gaikwad (वय 30, रा. कडवळवस्ती, लोहगाव, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा पार्ले जी बिस्कीट (Parle G Biscuit), मार्लबोरो सिगारेट डिस्ट्रीब्यूटर (Marlboro Cigarette Distributor) तसेच शेती व्यवसाय आहे. त्यांना स्वसंरक्षणाकरिता आर्म लायसन्स पाहिजे होते. यासाठी त्यांनी मुंबई मंत्रालयातील गृह विभागात अर्ज केला होता. आरोपीने फिर्यादी यांना फोन करून त्यांचा मित्र नितीन भोसले याची ओळख सांगितली. तसेच तुम्हाला शस्त्र परवाना मिळवून देतो असे सांगून फिर्यादी यांचा मावस भाऊ मयूर गवळी याच्या घरी बोलावून घेतले.

 

फिर्यादी हे भावाच्या घरी गेले असता, आरोपीने मी मुंबईत मंत्रालयात असतो. मी गृह विभागातील कामे पाहत असतो.
मला तुमची फाइल मिळाली त्यावरून मी तुमचा फोन नंबर घेऊन संपर्क केल्याचे सांगितले.
तसेच मी शहरात अनेकांना शस्त्र परवाना मिळवून दिला असून,
तुम्हालाही पाच ते सहा महिन्यांत शस्त्र परवाना मिळवून देतो असे सांगितले.
फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेऊन वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन असे 8 लाख 63 हजार रुपये दिले.
पैसे देऊनही आरोपीने शस्त्र परवाना मिळवून न देता आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मणेर करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | 9 lakh fraud of a businessman on the pretext of arms license; Incidents in Wakad area

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | बदनामीची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; येरवडा परिसरातील घटना

Ahmednagar Crime | कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन न केल्याने विद्यार्थ्याची शिक्षिकेला शिवीगाळ

 

Related Posts