IMPIMP

Pune Police | आयुष्य घडवण्यासाठी ध्येय ठरवणे गरजेचे, गुन्हे शाखेकडून अल्पवयीन मुलांचे समुपदेशन

by nagesh
Pune Police | Goal setting is necessary to make a life, Counseling of minors by crime branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये कोयता गँगने (Koyta Gang) दहशत माजवली आहे. कोयता गँगवर पोलिसांकडून (Pune Police) कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुन्हेगारी कृत्य करण्याकरीता कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांचा वापर केला जात असल्याची बाब पोलिसांच्या (Pune Police) लक्षात आली. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून (Crime Branch) कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांचे समुपदेशन करण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोयता गँगमध्ये कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांचा वापर केला जात असल्याने यावर उपाययोजना करण्याबाबत पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेने अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार आर.के. फाऊंडेशनचे (R.K. Foundation) भाग्यश्री साळुंखे व आनंद साळुंखे यांनी सोमवारी (दि.16) हडपसर येथील अण्णासाहेब मगर कॉलेज मधील (Annasaheb Magar College) मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य घोरपडे, उप प्राचार्य जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल (Senior Police Inspector Rajnish Nirmal) तसेच कॉलेजमधील 125-150 विद्यार्थी उपस्थित होते. (Pune Police)

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी समाजात गुन्हेगारीचे प्रमाण कसे वाढत आहे.
गुन्हेगारी आणि चुकीच्या सवयी यामुळे आयुष्याचे कसे नुकसान होते आणि आयुष्य कसे वाया जाते याबाबत मार्गदर्शन केले.
तर आर.के फाऊंडेशनच्या भाग्यश्री साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुष्यात गुन्हेगारीने कसे
नुकसान होते, चुकीचा मार्ग हा कसा त्रासदायक असतो आणि आपले आयुष्य घडविण्यासाठी आपले ध्येय काय आहे
हे ठरवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
तसेच गुन्हेगार कशाप्रकारे अल्पवयीन मुलांची दिशाभूल करुन त्यांना त्यांच्या गँगमध्ये सहभागी करुन घेऊन त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करुन घेतात.
तसेच गुन्हे दाखल झाल्यानंतर भविष्यात करीअरसाठी येणाऱ्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उप प्राचार्य़ जगातप यांनी केले. तर प्रास्ताविक प्राचार्य घोरपडे यांनी केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Police | Goal setting is necessary to make a life, Counseling of minors by crime branch

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | कर्जबाजारी झालेल्याने महिलेला लुटण्याचा प्रकार आला अंगाशी; कात्रजमधील संतोषनगर येथील घटना

Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून संजय राऊत यांनी सरकारला फटकारले; म्हणाले…

 

Related Posts