IMPIMP

Pune Police Suspended | पुण्यातील पोलीस उपायुक्तांच्या प्रस्तावात केली परस्पर ‘खाडाखोड’; पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune Crime News | A policeman who attempted 'recovery' near 'Dagdusheth' on Sankashti Chaturthi has been suspended

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Police Suspended | पोलीस उपायुक्तांच्या प्रस्तावात पोलीस अंमलदाराने परस्पर स्वहस्ताक्षरात खाडाखोड करुन कालावधीत बदल केलेला अहवाल जिल्हा सरकारी कार्यालयात दाखल केला. या खाडाखोडीची पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड (DCP Pornima Gaikwad) यांनी गंभीर दखल घेऊन एका पोलीस अंमलदाराला निलंबित (Pune Police Suspended)
केले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पोलीस नाईक स्वप्नील बारटक्के असे त्यांचे नाव आहे. स्वप्नील बारटक्के यांची उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) नेमूणक करुन त्यांना परिमंडळ ३ च्या कार्यालयात प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. कोथरुड (Kothrud) येथील एका गुन्ह्यात प्रस्तावित कार्यवाहीबाबत अभिप्राय मिळविण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी केला होता. तो शिवाजीनगर येथील जिल्हा सरकारी वकिलांकडे देण्यासाठी १ सप्टेंबर रोजी बारटक्के यांच्याकडे दिला होता. त्यांनी या प्रस्तावात पोलीस उपायुक्त यांची पूर्व परवानगी न घेता परस्पर स्वहस्ताक्षरात त्यांच्या प्रस्तावात नमूद केलेल्या दिवसाच्या कालावधीच्या जागी १ खोडून ७ अशी खाडाखोड करुन कालावधी बदल झालेला अहवाल जिल्हा सरकारी कार्यालयात दाखल करुन कर्तव्यात गंभीर कसुरी केली. हा प्रकार समजताच पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी स्वप्नील बारटक्के याला निलंबित (Pune Police Suspended)
केले आहे.

 

Web Title : Pune Police Suspended | police naik swapnil bartakke of uttam nagar police station suspended by dcp pornima gaikwad

 

हे देखील वाचा :

Corporator Dheeraj Ghate | महापालिका निवडणुकीचा मार्ग ‘साफ’ करण्यासाठी धीरज घाटे यांच्यावर हल्ल्याचा ‘कट’; एका राजकीय पक्षाच्या तिघांच्या अटकेने शहरात खळबळ, जाणून घ्या ‘अंदर की बात’

Obesity Problems | शास्त्रज्ञांचा इशारा : 18-24 वर्षाच्या तरूणांमध्ये ‘या’ समस्येचा सर्वात जास्त धोका, होऊ शकतात अनेक आजार; जाणून घ्या

Pune ACP Transfer | सहायक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांची सिंहगड रोड विभागात नियुक्ती

 

Related Posts