IMPIMP

Corporator Dheeraj Ghate | महापालिका निवडणुकीचा मार्ग ‘साफ’ करण्यासाठी धीरज घाटे यांच्यावर हल्ल्याचा ‘कट’; एका राजकीय पक्षाच्या तिघांच्या अटकेने शहरात खळबळ, जाणून घ्या ‘अंदर की बात’

by nagesh
Corporator Dheeraj Ghate | Pune Crime | Plot to assassinate of BJP corporator Dheeraj Ghate; pune police crime branch arrest three who belonging to a political party

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Corporator Dheeraj Ghate | आगामी महापालिका (Pune Corporation) निवडणुकीचा मार्ग साफ करण्यासाठी भाजपचे नगरसेवक धीरज घाटे (BJP Corporator Dheeraj Ghate) यांच्यावर हल्ला करुन जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने एका राजकीय पक्षाच्या तिघा कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

वितुल ऊर्फ विकी वामन क्षीरसागर (वय ३३, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा कॉलनी), मनोज संभाजी पाटोळे (वय ३०, रा. साने गुरुजीनगर) आणि
महेश इंद्रजित आगलावे (वय २५, रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी भाजपचे नगरसेवक धीरज रामचंद्र घाटे BJP Corporator Dheeraj Ghate (वय ४६, रा. स्रेहनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांनी कट रचणे (१२० ब) आणि गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे (११५) कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. धीरज घाटे हे आंबिल ओढा कॉलनी परिसरातून निवडून आले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आरोपी विकी क्षीरसागर हा पूर्वी घाटे यांच्याबरोबर काम करीत असे. मात्र, ५ वर्षांपूर्वीपासून त्याने घाटे यांचे काम करणे बंद केले. विकी क्षीरसागर याचा
भाऊ राकेश क्षीरसागर हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. २०२२ मधील महापालिका निवडणुकीसाठी राकेश क्षीरसागर इच्छुक आहे. विकी
क्षीरसागर हा घाटे यांच्याबरोकर काम करणार्‍या कार्यकर्त्यांना त्याच्याबरोबर काम करावे, यासाठी वेगवेगळी प्रलोभने दाखवित असे. त्याचबरोबर घाटे
यांच्या काही कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी २०२० मध्ये तीन ते चार वेळा भांडणेही केली होती. तेव्हा घाटे यांनी दोघांना समजावून सांगितले होते. तरीही विकी
क्षीरसागर व संतोष रणदिवे यांनी सुधीर म्हस्के यांना हाताने मारहाण केली होती. त्याबाबत म्हस्के यांनी दत्तवाडी व स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिली
होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

धीरज घाटे यांनी नवी पेठेतील ए जे कॉम्प्लेक्समध्ये जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे. तेथे ते ३ सप्टेंबर रोजी कामकाज पहात होते. नेहमीप्रमाणे ते व
त्यांचे कार्यकर्ते अमर आवळे हे चहा पिण्यासाठी शास्त्री रोडवरील शेफ्रन हॉटेलमध्ये सायंकाळी ४ वाजता गेले होते. ते ए सी रुममध्ये बसले असताना
आणखीन तिघे जण तेथे आले. त्यांच्यापैकी एकाकडे काळी बॅग होती. हॉटेलमध्ये ते बसले असताना घाटे यांना जाणवले की ते अधून मधून त्यांच्याकडे
पहात आहे. अमर आवळे यांनाही संशय आला. त्यामुळे अमर यांनी बाहेर जाऊन परत आले. तेव्हा त्यांना हॉटेलबाहेर विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे
हे थांबलेले आढळून आले. त्यांनी हे घाटे यांना सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

त्यानंतर संजय धोत्रे यांना कामे सांगायची असल्याने घाटे यांनी त्यांना हॉटेलमध्ये बोलावून घेतले.

त्याप्रमाणे संजय धोत्रे हे अर्धा पाऊण तासाने आले.
त्यावेळी हॉटेलमध्ये बसलेले तिघे जण त्यांच्या हालचालीकडे बारीक लक्ष देत होते व घाटे यांच्याकडे संशयितरित्या पाहत होते. त्यांच्यापैकी एक जण
त्यांच्याकडे पहात हॉटेल बाहेर गेला. त्यानंतर इतर दोघे निघून गेले. त्या तिघांचा संशय आल्याने त्यांनी १० मिनिटांनी दुसरीकडे चहा पिण्यासाठी जाण्याचे

ठरविले. बाहेर आल्यावर अमर आवळे याने घाटे यांना सांगितले की, या तिघांपैकी एक जण हा विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे यांच्याबरोबर काही तरी
बोलत होता. त्यांच्या हातात एक बॅग होती. त्यानंतर ते भांडारकर रोडवरील इराणी कॅफे येथे चहा पिण्यास गेले. तेथे चहा पित असताना शेफ्रन हॉटेल
येथील संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज पाहून माहिती घेण्याचे त्यांनी ठरविले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

त्याप्रमाणे ६ सप्टेंबर रोजी अमर आवळे याला शेफ्रन हॉटेलमध्ये पाठवून सीसीटीव्ही फुटेज घेतले. ते फुटेज पाहिले असता हॉटेलमधील ते संशयित विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे यांच्याशी ते निगडीत होते. त्यावेळी हॉटेलचे एका बाजूला ज्ञानल मंगल कार्यालय व दुसर्‍या बाजूला संकल्प मंगल कार्यालय आहे. त्या ठिकाणीही विकीचे साथीदार थांबलेले होते. त्यानंतर घाटे हे त्या मंगल कार्यालयात गेले. तेथे संशयित व्यक्तीबाबत चौकशी करता त्यांना

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

समजले की त्या व्यक्तींना कार्यालयातील स्टाफने हटकले होते. त्यावेळी त्यांनी हॉलची माहिती घेण्यास आलो आहे असे सांगितले, अशी त्यांना माहिती मिळाली. त्यावरुन घाटे यांना खात्री झाली  की आगामी महापालिका निवडणुकीत विकी क्षीरसागर याचा भाऊ राकेश क्षीसागर सहज निवडुन यावा, या करीता त्याने चार ते पाच साथीदारांना जमवून घाटे यांचा खुन करण्याचा कट रचून प्रत्यक्ष शेफ्रन हॉटेल येथे त्यांच्यावर हल्ला करण्याकरीता आला होता. अशी धीरज घाटे यांनी फिर्याद दिली.

 

त्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने (Pune Police Crime Branch) तिघांना अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महाजन अधिक तपास करीत आहेत.

 

आगामी महापालिका निवडणुका (Pune Corporation Elections) जवळ आल्या आहेत.
त्याचे राजकीय पातळीवर पडघम चालू लागले आहेत.
अनेक नेते आता शहरात कार्यक्रमानिमित्त येऊ लागले आहेत.
मात्र, गुन्हेगारी मार्गाने आपला राजकीय विरोधक संपविण्याचा कटामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Web Title : Corporator Dheeraj Ghate | Pune Crime | Plot to assassinate of BJP corporator Dheeraj Ghate; pune police crime branch arrest three who belonging to a political party

 

हे देखील वाचा :

Obesity Problems | शास्त्रज्ञांचा इशारा : 18-24 वर्षाच्या तरूणांमध्ये ‘या’ समस्येचा सर्वात जास्त धोका, होऊ शकतात अनेक आजार; जाणून घ्या

Pune ACP Transfer | सहायक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांची सिंहगड रोड विभागात नियुक्ती

बदलला LPG घरगुती गॅस सिलेंडरशी संबंधित ‘हा’ नियम! बुकिंगचे टेन्शन झाले दूर, जाणून घ्या

 

Related Posts