IMPIMP

Pune Rains | राज्यात पावसाचा जोर कायम ! पुण्यासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे; घराबाहेर न पडण्याचे आवाहन

by nagesh
Pune Rains | red alert for pune next 48 hours important for pune warning of heavy rainfall at the ghats avoid stepping out of the house

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Rains | राज्यात आजही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचं चित्र आहे. येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या शाळा बंद (Schools Closed) करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट (Red Alert For Pune) जारी केला आहे (Pune Rain Update). पुढील 48 तासात पुणे जिल्ह्यातील (Rain in Pune) घाटमाथ्यावर (Ghatmatha) तुफान अतिवृष्टी (Heavy Rain) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहराला (Pune City) येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या दरम्यान पुणेकरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. (Pune Rains)

 

पुण्यामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस (Pune Rains) कोसळत आहे. सर्वाधिक पाऊस लोणावळा (Lonavla) परिसरात सुरु आहे. याशिवाय खेड (Khed), आंबेगाव (Ambegaon), जुन्नर (Junnar), भोर (Bhor), वेल्हा (Velha), मुळशी (Mulshi), मावळ तालुका (Maval Taluka) मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागाने (Meteorological Department) या तालुक्यात असणाऱ्या घाटमाथा परिसरात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील 48 तास हे महत्त्वाचे राहणार आहेत. या पावसामुळे घाटात दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत बाहेर पडण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे जिल्ह्याला रेड तर शहराला येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
पावसामुळे झाडपडीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी बाहेर न पडता घरीच राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसामुळे पुण्यातील धरणे निम्मी भरली आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ही धरणे वेगाने भरली आहेत.
ही धरणे घाटमाथा परिसरात असल्याने लवकर भरणार आहेत. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

 

Web Title :- Pune Rains | red alert for pune next 48 hours important for pune warning of heavy rainfall at the ghats avoid stepping out of the house

 

हे देखील वाचा :

Hair Growth चा वेग वाढवण्यासाठी अद्भूत आहेत ‘या’ 6 बिया, सलाड किंवा स्नॅक्समध्ये खाऊन मिळवा जबरदस्त फायदा

Pune Crime | 10 टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या खाजगी सावकारावर गुन्हे शाखेकडून कारवाई

Yogasana | वाढत्या वयात महिलांनी करावीत ‘ही’ 2 योगासने, लोक सुद्धा म्हणतील चाळीशीत 25 ची दिसू लागलीस

 

Related Posts