IMPIMP

Pune Subhas Nagar Crime | हातात कोयता घेऊन तरुणाची ‘स्टंटबाजी’, सुभाषनगर परिसरातील प्रकार; खडक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Subhas Nagar Crime | हातात कोयता (Koyta) घेऊन ‘स्टंटबाजी’ करणं तरुणाला चांगलचं महागात पडलं आहे. नागरिकांनी दिलेल्या फोटोवरुन खडक पोलिसांनी (Khadak Police) तरुणाचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार सोमवारी (दि.1) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुभाषनगर गल्ली क्र.6 येथील नेहा अपार्टमेंट समोर घडला. (‘Stunt Baji’ of a young man with a Koyta in his hand, incident in Subhashnagar area; Khadak police arrest young man)

महेश सिद्धाप्पा भंडारी Mahesh Siddappa Bhandari (वय-22 रा. शंकर मंदिराजवळ, गल्ली. 19, जनता वसाहत पर्वती, पुणे) याच्यावर आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई भालचंद्र बबन दिवटे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुभाषनगर येथून एक महाविद्यालयीन युवती महाविद्यालयातून घरी जात होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने हवेत कोयता फिरवला. हा प्रकार बघून युवती घाबरुन निघून गेली. याबाबत नागरिकांनी तरुणाला विचारणा केली असता त्यांनी दमबाजी केली. दरम्यान, नागरिकांनी या प्रकाराची माहिती पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला (Pune Police Control Room) दिली.

नियंत्रण काक्षाने याबाबत फडगेट पोलीस चौकीत (Fadgate Police Chowki) कर्तव्यावर असलेले फिर्य़ादी यांना माहिती दिली. तसेच आरोपीचे वर्णन सांगितले. फिर्य़ादी यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला नेह अपार्टमेंट येथून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पँन्टच्या आतमध्ये कंबरेला एक लोखंडी कोयता मिळाला. पोलिसांनी दोनशे रुपये किमतीचा कोयता जप्त करुन आरोपीला अटक केली.

घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड (Sr PI Ravindra Gaikwad), पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत (PI Sampatrao Raut), पोलीस उपनिरीक्षक विशाल म्हेत्रे (PSI Vishal Mhetre), पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे (PSI Prahlad Dongle) यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pune Crime News | पुणे : दुचाकीला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न, चार कोयते जप्त; पानशेत रस्त्यावरील घटना