IMPIMP

Pune Crime News | पुणे : दुचाकीला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न, चार कोयते जप्त; पानशेत रस्त्यावरील घटना

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरून दुचीकाला चारचाकी गाडीने जाणूनबुजून धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे (Attempt To Murder). ही घटना शनिवारी (दि.30) रात्री साडे नऊच्या सुमारास पानशेत रस्त्यावर (Panshet Road) घडली आहे. पोलिसांनी चारचाकी गाडीतून चार धारदार कोयते जप्त केली आहेत.

शनिवारी रात्री शिवम उर्फ चिक्या अनंद बरीदे (वय-23 रा. खडकवासला) हा त्याच्या दुचाकीवरुन नऱ्हे गावाकडे जात होता. त्यावेळी अजय नेटके याने कारमधून पाठीमागून येऊन शिवमच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे तो रस्त्यावर पडून जखमी झाला. त्यावेळी चिक्याने अजय नेटके व त्याच्या तीन साथीदारांना ओळखले. आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन मुद्दाम धडक दिल्याचे त्याच्या लक्षात आले.

चिक्याने तात्काळ डायल 112 वर कॉल करुन पोलिसांकडे मदत मागितली. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार चंद्रकांत शिंदे हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहताच आरोपी गाडी सोडून पळून गेले. शिंदे यांनी चिक्यकडे चौकशी केली असता, जुन्या भांडणातून अजय नेटके व त्याच्या साथीदारांनी दुचाकीला धडक देऊन जखमी केल्याचे सांगितले. चंद्रकांत शिंदे यांनी आरोपींच्या गाडीची पाहणी केली असता मगील शिटवर असलेल्या पोत्यात चार धारदार कोयते आढळून आले.

याबाबत चंद्रकांत शिंदे यांनी याची माहिती प्रभारी अधिकारी सचिन वांगडे यांना दिली. वांगडे व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गुन्ह्यातील आरोपींचा उद्देश व गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला.

शिवम उर्फ चिक्या अनंद बरीदे याने दिलेल्या फिर्य़ादीवरुन अजय नेटके व इतर तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली. पथकांनी रात्रभऱ आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.

Bachchu Kadu Targets Navneet Rana | बच्चू कडू वर्ध्यातून निवडणूक लढवणार? ३०० कार्यकर्त्यांनी रक्तदानाद्वारे केली मागणी, नवनीत राणांबद्दल म्हणाले…

Related Posts