IMPIMP

Rain in Maharashtra | राज्यात ‘या’ तारखेपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार

by nagesh
Rain in Maharashtra | pune news signs of rain re activating across the state

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Rain in Maharashtra | मागील काही महिन्यापासून राज्यात मुसळधार पावसाने जोर धरला. यामुळे राज्यातील काही ठिकाणी दरडी कोसळल्या तर काही पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाले. मात्र, गेल्या काही दिवसापासून पावसाची गती कमी झाली आहे. पाऊस नाहीसा झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. मात्र पुन्हा एकदा 16 ऑगस्टपासून राज्यात (Rain in Maharashtra) पाऊस हालचाल करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) व्यक्त केला आहे. कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात सध्या हलका ते मध्यम गतीच्या पावसाला सुरुवात झालीय. तसेच, बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 16 ऑगस्टपासून पाऊस (Rain) सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात (Vidarbha) काही भागात मुसळधार, तर मराठवाडा (Marathwada) आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.
दरम्यानं जुलै महिन्यात कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्ट्रातील घाटमाथ्यावर विक्रमी पाऊस झाला आहे. या ठिकाणी अजून देखील हलका आणि मध्यमरित्या पाऊस पडत आहे.

 

या दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीपासून महाराष्ट्रात पावसाची (Rain) गती कमी झालीय.
तसेच, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाने दीर्घ ओढ दिली आहे. 2आठवड्यांपासून जादा काळापर्यंत पाऊस पडला नाही.
यामुळे खरिपाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
परंतु, २ ते ३ दिवसामध्ये या ठिकाणी देखील पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) व्यक्त केली आहे.

 

Web Title : Rain in Maharashtra | pune news signs of rain re activating across the state

 

हे देखील वाचा :

Milind Narvekar | ‘मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू’; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वीय सहायकास धमकी

Anti Corruption | जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मागितली लाच; प्राचार्यासह एक जण अटकेत

BJP Jan Ashirwad Yatra | महाराष्ट्रात BJP ची नवी दुहेरी रणनीती; ‘या’ मंत्र्यावर सोपवली मोदी सरकारने मोठी जबाबदारी

 

Related Posts