IMPIMP

Talegaon News | वाहनाच्या धडकेनं झोमॅटो डिलिव्हरी दुचाकीस्वार बॉयचा मृत्यू

by nagesh
Pune News | An engineer from Pune wakad was killed and his wife and son were seriously injured in an accident near Kameri islampur

तळेगाव दाभाडे : सरकारसत्ता ऑनलाइन –  भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार डिलिव्हरी बॉयचा (Two-wheeler delivery boy) मृत्यू झाला. हा अपघात तळेगाव दाभाडे (Talegaon News) येथील सेंट माउंट चर्चसमोर (St. Mount Church) शनिवारी (दि.4) रात्री आठच्या सुमारास झाला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

विश्वनाथ बाबू जमादार (वय-33) असे अपघातात मृत्यू झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे.
याप्रकरणी अशोक प्रेमनाथ घोसले (वय-38 रा. दुर्वांकुर बिल्डींग 02, प्लॉट नं.21 मार्केट यार्ड, राजगुरुनगर, ता. खेड) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोसले यांचे भाऊजी विश्वनाथ हे झोमॅटो कंपनीत (Zomato Company) डिलिव्हरी बॉयचं काम करत होते.
चाकण-वाडगांव रस्त्याने (Chakan-Wadgaon road) डिलिव्हरी देण्यासाठी दुचाकीवरुन जात होते.
सेंट माउंट चर्चसमोर अज्ञात वाहनाने विश्वनाथ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली.
यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच घटनेची माहिती न देता पळून गेला. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Talegaon News | Zomato delivery two-wheeler boy killed in vehicle crash

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याचे दर कमी झाले, अजूनही गुंतवणुकीची चांगली संधी; जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवीन दर

Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा जोर; आगामी 3 दिवस मुसळधार; पुण्यासह कोकणात Alert

Bank Locker Rules | एखाद्या बँकेत नसेल अकाऊंट तरीसुद्धा मिळेल लॉकरची सुविधा, RBI ने नियमांमध्ये केला बदल; जाणून घ्या

 

Related Posts