IMPIMP

TET Exam Scam | प्रितीश देशमुखने 20 लाख दिलेला हरीदास ठोळ कोण ? टीईटी गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता

प्रितीश देशमुखने वडिलांच्या खात्यावरुन सावरीकर, अश्विनकुमारच्या खात्यात पाठविले होते पैसे

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनशिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam Scam) अपात्र परीक्षार्थींचे एजंटांकडून मिळालेले पैसे जी. ए. सॉफ्टवेअरच्या (GA Software Technologies) प्रीतीश देशमुख (GA Software Pritish Deshmukh) याने वडिलांच्या बँक खात्यावरुन अश्विनकुमार (Ashwinkumar) आणि शिक्षण विभागाचा सल्लागार अभिषेक सावरीकर (Abhishek Savrikar) यांच्या खात्यात पैसे पाठविल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच प्रितीश देशमुख याने १४ मे २०१९ रोजी हरीदास जानबाजी ठोळ (Haridas Janbaji Thol) याच्या खात्यात २० लाख रुपये पाठविले होते. हा ठोळ नेमका कोण याचा तपास सायबर पोलीस (Pune Cyber Police) करीत आहेत. (TET Exam Scam)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

प्रितीश देशमुख (Pritish Deshmukh), सुरंजित पाटील (Suranjeet Patil) आणि स्वप्निल पाटील ऊर्फ राजपूत (Swapnil Patil-Rajput) यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते. यावेळी पोलिसांनी माहिती देताना न्यायालयात (Shivaji Nagar Court Pune) सांगितले की, प्रीतीश देशमुख याच्या खात्यात निलेश शेंडे (Nilesh Shende), अंकुश हरकळ (Ankush Harkal), स्वप्निल पाटील यांनी २०१८ व २०१९ मध्ये वेगवेगळ्या वेळी एकूण १० लाख ७८ हजार रुपये पाठविले होते. (TET Exam Scam)

 

प्रितीश देशमुख याने अभिषेक सावरीकर याला २४ ऑक्टोबर २०१८ रोजी ४९ हजार रुपये पाठविले होते. तसेच त्याचे वडिल दिलीप देशमुख (Dilip Deshmukh) यांनी १७ एप्रिल २०१८ रोजी १ लाख रुपये पाठविले होते. जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक अश्विनकुमार (Director of GA Software Ashwinkumar) याच्या बँक खात्यात दिलीप देशमुख यांनी १० सप्टेबर २०१८ रोजी १ लाख रुपये पाठविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Paper Leak Nexus)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रितीश देशमुख याने १४ मे २०१९ रोजी हरीदास जानबाजी ठोळ याला २० लाख रुपये पाठविले आहेत.
हा ठोळ नेमका कोण आणि त्याला देशमुख याने कशासाठी इतके पैसे पाठविले याचा तपास सायबर पोलीस करीत आहेत.
हा ठोळ कोण हे स्पष्ट झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.
याचा तपास करण्यासाठी न्यायालयाने प्रितीश देशमुख याच्यासह तिघांच्या पोलीस कोठडीत ११ मार्चपर्यंत वाढ केली आहे.

 

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve),
अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale) आणि सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navtake) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सायबर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- TET Exam Scam | Who is Haridas Thol Rs 20 lakh by Pritish Deshmukh The TET malpractice case is likely to get a new twist

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime | महिलेच्या ‘शीला’ची किंमत PSI ने 30 लाख लावल्याने राज्यभर संताप ! ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजेवर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Pune Crime | पुण्यातील कोंढवा परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) छापेमारी; इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस व कागदपत्रे जप्त

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | महिला दिनाच्या पूर्व संध्येला बलात्काराच्या गुन्हात आरोपी न करण्यासाठी 37 लाखाच्या लाचेची मागणी; 7 लाख अ‍ॅडव्हान्स घेताना पोलिस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात, 2 लाख वरिष्ठ निरीक्षकासाठी तर 30 लाख पीडितेसाठी

 

Related Posts