IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | महिला दिनाच्या पूर्व संध्येला बलात्काराच्या गुन्हात आरोपी न करण्यासाठी 37 लाखाच्या लाचेची मागणी; 7 लाख अ‍ॅडव्हान्स घेताना पोलिस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात, 2 लाख वरिष्ठ निरीक्षकासाठी तर 30 लाख पीडितेसाठी

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | महिला दिनाच्या (World Woman’s Day) पूर्व संध्येला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेची समजूत घालून बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकांने Police Sub Inspector (PSI) तब्बल ३७ लाख रुपयांची मागणी (Mumbai Bribe Case) केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्यापैकी ७ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे. भरत लक्ष्मणराव मुंढे PSI Bharat Laxmanrao Mundhe (वय ३३) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंढे हा सध्या ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात (NM Joshi Marg Police Station) नेमणुकीला आहे.

 

याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एक बलात्काराचा गुन्हा (Rape Case In Mumbai) दाखल झाला आहे. त्याचा तपास भरत मुंढे याच्याकडे आला होता. त्याने यातील आरोपीशी संपर्क साधला. त्याला गुन्ह्यात अटक करु नये, यासाठी लाच मागितली. तसेच त्याच्या नातेवाईकालाही सहआरोपी करण्याची धमकी दिली. त्यानंतर मुंढे याने बलात्काराच्या गुन्ह्यातील तक्रारदार हिची समजूत घालून त्याच्याविरुद्ध तक्रार करु नये, यासाठी त्याने तक्रारदाराकडे स्वत:साठी ५ लाख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) याच्यासाठी २ लाख व बलात्काराच्या गुन्ह्यातील फिर्यादीला देण्यासाठी ३० लाख रुपये अशी एकूण ३७ लाख रुपये लाचेची मागणी केली. (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai)

 

त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्याची ४ मार्च रोजी पडताळणी केली. त्यात भरत मुंढे (Bharat Mundhe) याने ३७ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर या ३७ लाखांपैकी ७ लाख रुपयांची लाच घेताना
भरत मुंढे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. (Caught Raid Hand While Taking Bribe of 7 lacs)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अनेक जात पंचायतीत (Jat Panchayat) बलात्काराच्या घटनेची तक्रार आल्यावर
त्यात पंच मंडळी काही हजार रुपये दंड करुन ही केस मिटवितात.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | Demand for bribe of Rs 37 lakh for not being accused in rape case on the eve of world Women’s Day; ACB Mumbai Arrested PSI Bharat Mundhe while taking bribe of Rs 7 lakh in advance

 

हे देखील वाचा :

Nandurbar Police | टँकर चोरणाऱ्याला नंदुरबार पोलिसांकडून अटक, 45 लाखाचा मुद्देमाल जप्त

Nandurbar Police | गोडावूनमधून धान्य चोरणाऱ्या तिघांना अटक, नंदुरबार पोलिसांची परराज्यात मोठी कारवाई

Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

 

Related Posts