IMPIMP

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

by omkar
Anti-Corruption Bureau
सरकारसत्ता ऑनलाइन – Anti-Corruption Bureau | रस्ता कॉंक्रीट कामाचे बिल (Bill) मंजुर करून देण्याच्या मोबदल्यात ठेकेदाराकडून 40 हजाराची लाच (Bribe) घेताना करगणी (Kargani) ग्रामपंचायतीच्या सरपंचाला (ता. आटपाडी, जि. सांगली) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) रंगेहाथ पकडले आहे. त्याच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Chinese goods in India | चीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू

गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39, रा. करगणी, ता. आटपाडी ) असे अटक केेलेल्या सरपंचाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी करगणी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील  नवबौध्द समाजगल्ली शेटफळे रस्ता येथील  रस्ता कॉंक्रीटचे काम घेतले होते.
सदर कामाचे बील मंजूर करून देण्याच्या मोबदलल्यात सरपंच खंदारे यांनी  4 टक्के रक्कम म्हणून 40 हजाराची लाच ठेकेदाराकडे मागितली होती.
त्यामुळे ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  (Anti-Corruption Bureau) तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने (ACB)  ग्रामपंचायत करगणी येथे सापळा रचून 40 हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे,
अप्पर पोलीस उपायुक्त  सुभाष नाडगौडा,
पोलीस उपअधिक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे,
पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले, तसेच कर्मचारी संजय कलकुटगी, अविनाश सागर, संजय संकपाळ, सलीम मकानदार, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.

Governor appointed MLA | विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडेच असल्याची माहिती समोर

Antilia Bomb Scare Case | अँटिलिया प्रकरणात NIA ने दोन जणांना केली अटक, लातूर कनेक्शन उघड

Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat on Vaccination | ‘मुस्लीम समाजातील लोक कोविड लस घेण्यास टाळाटाळ करतात’

Related Posts