IMPIMP

ACB Trap News | लाचखोर सरकारी वकिलास एसीबीच्या पथकाने पाठलाग करुन पकडले, खटला निकाली काढण्यासाठी स्वीकारली लाच

by sachinsitapure
Accepting Bribe Case

सांगली : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात तडजोड घडवून तो लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर (Accepting Bribe) बुलेटवरुन निघालेल्या सहायक सरकारी अभियोक्ता (Public Prosecutor) अ‍ॅड. सोमनाथ काकासो माळी Adv. Somnath Kakaso Mali (वय-36 रा. गणेश कॉलनी, सुभाषनगर, मिरज) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB Trap News) पाठलाग करुन रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.11) करण्यात आली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत 52 वर्षीय व्यक्तीने सांगली एसीबकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. अ‍ॅड. सोमनाथ माळी हा सांगलीत प्रथमवर्ग न्यायालयात सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल आहे. या खटल्यात तडजोड घडवून तो लवकर निकाली काढण्यासाठी अ‍ॅड. माळी याने तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी सांगली एसीबी कार्यालयात (Sangli ACB) तक्रार दिली होती.

एसीबीच्या पथकाने सोमवारी तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये अ‍ॅड. माळी याने तक्रारदार यांच्याकडे खटला निकाली काढण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 20 हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विजयनगर येथे जिल्हा न्यायालयाबाहेर (District Court) सापळा लावण्यात आला. त्यावेळी अ‍ॅड. माळी याने विजयनगर रस्त्यावर दुचाकीवरच तक्रारदाराकडे लाचेची मागणी करुन 20 हजारांची लाच स्वीकारली.

लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर अ‍ॅड. माळी त्याच्या बुलेटवरुन निघाला. त्यामुळे पथकाने त्याचा पाठलाग सुरु केला.
अ‍ॅड. माळी नेमिनाथनगर येथे श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल हायस्कूल व कॉलेज येथे आल्यानंतर त्याला
पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) गुन्हा दाखल करुन अटक केली.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी
(Addl SP Vijay Chaudhary) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संदीप पाटील (DySP Sandeep Patil),
पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी (PI Dattatraya Pujari), पोलीस निरीक्षक विनायक भिलारे (PI Vinayak Bhilare),
पोलीस अंमलदार धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, चालक वंटमुरे यांच्या पथकाने केली.

Related Posts