IMPIMP

ACB Trap News | सव्वा लाखाची लाच घेताना महापालिकेतील अग्निशमन अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Municipal fire officer caught in anti-corruption net while taking bribe of Rs 125000

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन – फायर फायटिंग सिस्टम (Fire Fighting System) बसविल्याच्या कामाचा अंतिम दाखला देण्याच्या मोबदल्यात 1 लाख 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) सांगली महापालिकेच्या (Sangli Municipal Corporation) प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याला (Fire Officer) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले. विजय आनंदराव पवार Vijay Anandrao Pawar (वय-50 रा. संभाजीनगर, त्रिमुर्ती कॉलनी, सांगली) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याचे नाव आहे. सांगली एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई मंगळवारी (दि.27) टिंबर एरिया येथील अग्नीशमन विभागाच्या कार्यालयात केली.

याबाबत तक्रारदार यांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदाराच्या कंपनीकडून फायर फायटिंग सिस्टम बसविण्याची कामे केली जातात. अशाच एका कामाचा अंतिम दाखला देण्याच्या मोबदल्यात पवार याने दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच पैसे दिले नाही तर कंपनीकडून करण्यात येणाऱ्या पुढील कामाचे दाखले देणार नाही असेही पवार याने तक्रारदार यांना सांगितले होते. तडजोडी अंती सव्वा लाख रुपये देण्याचे ठरले. (Sangli Bribe Case)

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Sangli ACB Trap News) तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता विजय पवार याने दीड लाख रुपयांची मागणी करत तडजोडी अंती सव्वा लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी टिंबर एरिया येथील अग्नीशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची सव्वा लाखांची रक्कम स्विकारताना विजय पवार याला रंगेहाथ पकडण्यात आले. पवार याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील (DySP Sandeep Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक भिलारे (PI Vinayak Bhilare), दत्तात्रय पुजारी, अजित पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रविंद्र धुमाळ यांच्या पथकाने केली.

Web Title : ACB Trap News | Municipal fire officer caught in anti-corruption net while taking bribe of Rs 125000

Related Posts