IMPIMP

Sangli Crime News | सांगलीतील भाजप नगरसेवक हत्या प्रकरणात नवीन खुलासा; पक्षातील ‘हा’ नेता आहे मुख्य सूत्रधार

by nagesh
Sangli Crime News | vijay tad murder case 4 arrested wanted former corporator umesh sawant

सांगली : सरकारसत्ता ऑनलाईन – Sangli Crime News जतमधील भाजपचे (BJP) माजी नगरसेवक विजय ताड (Vijay Taad) यांच्या हत्या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. विजय ताड यांच्या हत्येप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताड यांचे भाऊ विक्रम ताड (Vikhram Taad) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सांगली पोलिसांनी (Sangli Police) या प्रकरणी मोठी कारवाई करत गोकाकमधून चौघांना अटक केली आहे.

 

 

काय आहे नेमके प्रकरण?

विजय ताड यांची शुक्रवारी 17 मार्च रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यामध्ये 5 आरोपींची नावे समोर आली होती. त्यामधील एकजण हा भाजपचा माजी नगरसेवक आहे. या प्रकरणी पोलिसांनी तडक कारवाई करत यामधील चौघांना कर्नाटकातील गोकाकमधून अटक करण्यात आली तर या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक उमेश सावंत (Umesh Sawant) हे अद्याप फरार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

घटनेच्या दिवशी काय घडले होते नेमके?

घटनेच्या दिवशी म्हणजेच 17 मार्च रोजी विजय ताड हे दुपारच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. तेव्हा सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूल (Alphonso School) जवळ हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला तसेच त्यांच्या डोक्यामध्ये
दगड घालून त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
या घटनेची माहिती मिळताच सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली. बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दादा मदने,
आकाश व्हनखंडे आणि किरण विठ्ठल चव्हाण अशी या प्रकरणातील चौघा संशयितांची नावे आहेत.
तर माजी नगरसेवक उमेश सावंत हे फरार असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती
पोलीस अधीक्षक बसवराज तेली (Superintendent of Police Basavaraj Teli) यांनी दिली आहे.

 

 

Web Title :  Sangli Crime News | vijay tad murder case 4 arrested wanted former corporator umesh sawant

 

हे देखील वाचा :

Jalgaon Crime News | प्रेमसंबंध ठेव नाहीतर आत्महत्या करेन; तरुणाच्या धमकीने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Pune Kondhwa News | कोंढव्यात नागरिकांची बैठक ! रमजानच्या पवित्र महिन्यात सौहादर्याचे वातावरण ठेवा – पाेलीस सह आयुक्त संदीप कर्णिक

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

 

Related Posts