IMPIMP

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar criticized sanjay gaikwad after statement on government employee

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  सरकारी कर्मचारी संपावर (Government Employees Strike) गेल्याने शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड
(Shinde Group MLA Sanjay Gaikwad) यांनी 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामीची कमाई आहे, असे वादग्रस्त विधान केलं होत. यावरुन
अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत संजय गायकवाड यांना चांगलेच सुनावले. यावेळी
बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांच्या पंचनाम्याच्या (Panchnama) मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले अजित पवार?

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अद्यापही शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेले नाहीत. आता कर्मचाऱ्यांचा संप आणि शेतपिकांचे पंचनामे हे दोन्ही विषय एकमेकांशी निगडीत झाले आहेत. महाराष्ट्र हा दुहेरी कात्रीत सापडला आहे. अशावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. मात्र, सत्ताधारी पक्षातील आमदार संजय गायकवाड हे 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे, असे वक्तव्य करत आहेत. हे पटतं का? अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

 

 

तर राज्य चालवणं कठीण होईल

ते पुढे म्हणाले, हाताची पाचही बोटं सारखी नसतात, हे आम्हालाही मान्य आहे. मात्र, सर्वच कर्मचाऱ्यांना तुम्ही एकसारखं समजणार असाल, आणि तेच जर नाऊमेद झाले तर राज्य चालवणं कठीण होईल. पंचनामे कसे होणार? गरपिटीने ग्रस्त शेतकऱ्यांना मदत कशी होणार? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच ज्या भागात नुकसान झाले आहे त्या भागातील सरकारी कर्मचाऱ्यांनी माणुसकीच्या भावनेने ताबडतोब कामावर परत यावं, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, असं आवाहन देखील त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सरकार गंभीर नाही

वादळी पावसामुळे (Stormy Rain) मराठवाड्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
100 च्या आसपास पशूधनाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, कर्मचारीही संपावर आहे.
त्यामुळे सरकारने तातडीने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. परंतु सरकार या मुद्यांवर गंभीर दिसत नाही.
अशावेळी किमान विधानसभा अध्यक्षांनी (Assembly Speaker) तरी सरकारला आदेश काढावेत,
त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी सरकारला सुनावलं.

 

 

Web Title : Ajit Pawar | ajit pawar criticized sanjay gaikwad after statement on government employee

 

हे देखील वाचा :

Pune Crime Suicide News | भाजप नेत्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीची पुण्यात आत्महत्या

Pune Crime News | दुचाकीच्या चोरीसाठी भामट्यांची अनोखी शक्कल ! टेस्ट ड्राइव्हचा बहाण्याने दुचाकी पळवली, दिवसाढवळ्या घडला प्रकार

Poona Gujarati Bandhu Samaj | पूना गुजराती बंधू समाजच्या वतीने कोंढव्यात महोत्सव, समाजातील 4 ते 5 हजार जणांचा सहभाग

 

Related Posts