IMPIMP

Jasprit Bumrah Marriage : विवाहबद्ध होणार क्रिकेटर जसप्रीत बुमराह ! अ‍ॅक्ट्रेस की कॉमेंटेटर ? ‘या’ 2 नावांची जोरदार चर्चा

by nagesh
Jasprit Bumrah

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यानं काही दिवसांपूर्वीच सुट्टी घेतली आहे. याचं खरं कारण आता समोर आलं आहे. लवकरच तो लग्न करणार आहे. परंतु त्याची भावी पत्नी कोण याची कुणलाच माहिती नाही. मात्र 2 नावं अशी आहेत ज्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यापैकी एक आहे फेमस क्रिकेट प्रेझेंटेटर संजना गणेशन (Sanjana Ganesan) आणि दुसरं नाव साऊथमधील फेमस अ‍ॅक्ट्रेस अनुपमा परमेश्वरन (Anupama Parameswaran) आहे.

कोण आहे संजना गणेशन ?
संजना ही फेमस क्रिकेट प्रेझेंटेटर आहे. आजवर तिनं अनेक क्रिकेट कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्ससाठी फॅन शो देखील तिनं होस्ट केला आहे. संजना आणि जसप्रीत (Jasprit Bumrah) दोघंही क्रिकेटमध्ये आहेत. त्यामुळं हे दोघं लग्न करणार अशी चर्चा दिसत आहे.

कोण आहे अनुपमा परमेश्वरन ?


अनुपमा परमेश्वरन ही साऊथमधील एक फेमस अ‍ॅक्ट्रेस आहे. तिचं नावही बुमराह सोबत जोडलं जात आहे. काही दिवसांपर्वीच तिनं गालावर रंग लावल्याचा एक फोटो शेअर केला होता. यात ती हॉलिडेचा आनंद घेताना दिसली होती. बुमराहनं काही दिवसांपूर्वी सुट्टी घेतली आहे आणि अनुपमाही काही दिवसांच्या सुट्टीवर आहे. त्यामुळं बुमराह आणि अनुपमा यांच्या नावाच्या चर्चांनीही जोर धरला आहे.

कधी आणि कुठे होणार लग्न ?

जसप्रीत बुमराह यानं लग्नासाठी सुट्टी घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
परंतु लग्नाबद्दल त्यानं कोणतीही माहिती दिलेली नाही.
परंतु असं म्हटलं जात आहे की, टुरिस्ट पॉईंट असणाऱ्या गोव्यात त्याचं लग्न पार पडणार आहे.
त्याआधी बुमराह कुटुंबीयांसोबत मुंबईत येणार आहे.
सूत्रांनी अशी माहिती दिलीय की, कोरोनामुळं या लग्नाला मोजकीच लोकं असतील.
विशेष म्हणजे टीम इंडियाच्या खेळाडूंनाही या लग्नाला उपस्थित राहता येणार नाही.

समता प्रतिष्ठान घोटाळ्याप्रकरणी 13 जण निलंबित; SIT चौकशीही होणार

Related Posts