IMPIMP

Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; व्हिजन लायन्स्, लेपर्डस् इलेव्हन यांच्यात विजेतेपदासाठी लढत !!

by nagesh
Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘Vision Trophy’ Championship Under-15 Cricket Tournament; Vision Lions, Leopards XI fight for the title!!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद (Vision Cup Under-15 Cricket Tournament) १५ वर्षाखालील टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेत व्हिजन लायन्स् आणि लेपर्डस् इलेव्हन या संघांनी अनुक्रमे जॅग्वॉस इलेव्हन आणि लिंक्स् इलेव्हन या संघांचा पराभव स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. (Vision Cup Under-15 Cricket Tournament)

सनसिटी रोड येथील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी मैदानावर झालेल्या सामन्यात मध्यमगती गोलंदाज साहील कुलकर्णी याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर लेपर्डस् इलेव्हन संघाने लिंक्स् इलेव्हन संघाचा ६५ धावांनी सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना लेपर्डस् इलेव्हनने २० षटकात ५ गडी गमावून १५१ धावांचे आव्हान उभे केले. सलामीवीर अदवय सोनावणे याने ४३ धावा, अनवय रायकर याने २२ धावा तर, विग्नेश पेण्णेकर याने ३९ धावांचे योगदान देऊन संघाला दिडशे धावांचा टप्पा गाठून दिला. या आव्हानासमोर लिंक्स् इलेव्हनचा डाव ८६ धावांवर आटोपला. दुर्गेश सहानी याने २३ धावा काढून प्रतिकार केला. साहील कुलकर्णी याने ७ धावात ३ गडी टिपत अचूक गोलंदाजी केली व संघाचा विजय सोपा केला.

मध्यमगती गोलंदाज अमोघ नातू याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर व्हिजन लायन्स् संघाने जॅग्वॉर्स इलेव्हन संघाचा ३७ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना व्हिजन लायन्स् संघाने १५३ धावा धावफलकावर लावल्या. रणवीर मते याने डावाला आकार देताना ५९ धावांची खेळी केली. व्हिजन लायन्स् संघाच्या अमोघ नातू याने अफलातून गोलंदाजी करताना २२ धावात ५ गडी बाद करत जॅग्वॉर्स इलेव्हनचा निम्मा संघ तंबुत पाठवला. जॅग्वॉर्स संघाचा ११६ धावाच करता आल्या. आशय शेडगे (३३ धावा) आणि वीर बोहाट (३२ धावा) यांची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. (Vision Cup Under-15 Cricket Tournament)

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः

लेपर्डस् इलेव्हनः २० षटकात ५ गडी बाद १५१ धावा (अदवय सोनावणे ४३, अनवय रायकर २२, विग्नेश पेण्णेकर ३९)
वि.वि. लिंक्स् इलेव्हनः १६.४ षटकात १० गडी बाद ८६ धावा (दुर्गेश सहानी २३, साहील कुलकर्णी ३-७, सर्वेश जोशी
२-१३); सामनावीरः साहील कुलकर्णी;

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

व्हिजन लायन्स्ः २० षटकात ५ गडी बाद १५३ धावा (रणवीर मते ५९ (५६, ८ चौकार), श्रेयस व्हावळे २६,
शर्विल गोसावी १-१६) वि.वि. जॅग्वॉर्स इलेव्हनः २० षटकात ८ गडी बाद ११६ धावा
(आशय शेडगे ३३, वीर बोहाट ३२, अमोघ नातू ५-२२); सामनावीरः अमोघ नातू;

Web Title : Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘Vision Trophy’ Championship Under-15 Cricket Tournament; Vision Lions, Leopards XI fight for the title!!

Related Posts