IMPIMP

कल्याणमध्ये एका घरात आढळली शेकडो कोरी मतदान ओळखपत्र, प्रचंड खळबळ

by omkar
Voting ID - कल्याणमध्ये शेकडो कोरी मतदान ओळखपत्र

कल्याण : सरकारसत्ता ऑनलाइन – कल्याणमध्ये एका व्यक्तीच्या घरात एक दोन नव्हे तर 400 ते 500 कोरी मतदान ओखळपत्र (Voting ID) सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सापडलेली मतदान ओळखपत्र (Voting ID) पोलिसांनी जप्त केली आहेत.
या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून त्याच्या अटकेनंतर ही कार्ड कुठून आणली याचा उलगडा होणार आहे.

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा रेशन कार्ड; जाणून घ्या ऑनलाइन प्रोसेस

कामेश मोरे असे गुन्हा दाखल केलेल्या इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील माधव संसार गृहसंकुलातील एक प्लॅट कामेश मोरे याच्या नावावर आहे. पती- पत्नीत वाद असल्याने या घरात त्यांची पत्नी अन् मुले राहतात.
2 दिवसापूर्वी कामेश यांनी आपल्या मुलाना आपली कागदपत्र घेण्यासाठी येत असून आपल्या कपाटातून कागदपत्र काढून ठेवण्यासाठी फोन केला होता.
नंतर त्यांच्या पत्नीने त्याचे कपाट उघडले असता तिला कपाटात शेकडो कोरी मतदान ओळखपत्र (Voting ID) सापडली.
या ओळखपत्राचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात येताच तिने याची माहिती तहसीलदार दीपक आकडे यांना दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदाराचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
त्यांना कपाटात कोरी मतदान ओळखपत्र (Voting ID) अऩ् राजकीय पक्षाचे नोंदणी फॉर्म सापडले.
याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली.

Also Read:- 

Monsoon 2021 : 2 दिवसांत महाराष्ट्रात धडकणार ‘मान्सून’ !

Coronavirus : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून कसे रहायचे सुरक्षित? आतापासून सुरू करा ‘ही’ 8 कामे

Devendra Fadnavis : ‘प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु, कालचा गोंधळ जरा जास्तच झाला’ (व्हिडीओ)

राजीव सातव यांच्या जागेवर आता कोण? ‘राहुल-प्रियांका’ यांच्यात नावावरून मतभेद

नारायण राणेंच्या टीकेनंतर खा. संभाजीराजेंचं सूचक ट्वीट, म्हणाले…

Devendra Fadnavis : ‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)

2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये आता घरमालकाचा समावेश

 

Related Posts