IMPIMP

Satara ACP Trap Case | लाच घेताना बांधकाम विभागाचा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune ACB Trap News
March 27, 2024

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन – Satara ACP Trap Case | सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग वडूज येथील उपविभागीय अभियंत्याला 50 हजार रुपयांची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. जितेंद्र राजाराम खलीपे Jitendra Rajaram Khalipe (वय -51 सध्या रा. पेडगाव रोड, वडूज ता. खटाव, जि. सातारा. मूळ रा. जैन मंदिराजवळ, उभी पेठ, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.26) दुपारी केली. (Satara Bribe Case)

याबाबत एका व्यक्तीने सातारा एसीबीकडे तक्रार केली आहे. यातील तक्रारदार यांचा अर्थमूव्हर्स व डेव्हलपर चा व्यवसाय आहे. त्यांनी पंचायत समितीच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत तीन रस्त्यांचे काम व एक समूह गांडूळ निर्मिती शेडचे, अशी एकूण चार कामे केली होती. ही कामे पूर्ण केल्याचा दाखल देण्यासाठी वडूजमधील उपविभागीय अभियंता जितेंद्र खलिपे याने तक्रारदार यांच्याकडे एकूण 34 लाख रुपये बिलाच्या दोन टक्क्यांप्रमाणे 68 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 50 हजार रुपये देण्याचे ठरले.

त्यानंतर तक्रारदार यांनी सातारा एसीबी कार्यालयात जाऊन लेखी तक्रार केली. त्या तक्रारीची पडताळणी केली असता खलिपे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारी वडूज येथे सापळा लावण्यात आला. यावेळी खलिपे याला 50 हजार रुपये लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी (Vijay Chaudhary) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे (DySP Rajesh Waghmare), पोलीस निरीक्षक सचिन अंकुश राऊत (PI Sachin Raut), पोलीस अंमलदार गणेश ताटे, निलेश चव्हाण, चालक अडागळे यांच्या पथकाने केली.

Pune Wanwadi Crime | भररस्त्यात महिलेला अश्लील बोलून जीवे मारण्याची धमकी, वानवडी परिसरातील घटना